एक्स्प्लोर

औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील गौताळा अभयारण्यात पर्यटकांना 15 सप्टेंबरपर्यंत बंदी; वनविभागाचा निर्णय

Gautala Sanctuary : पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.

Gautala Sanctuary : पावसाळ्यात औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. दरम्यान, औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील गौताळा अभयारण्यात देखील अशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. सर्वत्र हिरवा शालू पांघरलेला आणि निसर्ग सौंदर्याची खाण असलेला गौताळा अभयारण्य पर्यटकांना खुणवत असते. मात्र, याच गौताळा अभयारण्यात आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वनविभागानं 15 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी घातली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असून, गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 

  • अनेक पर्यटक सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
  • अभयारण्यात जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो.
  • अशावेळी पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.

कन्नड तालुक्यामधील तब्बल गावातील वनक्षेत्राचा समावेश असलेल्या गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली. कन्नड तालुक्यात असलेलं हे अभयारण्य औरंगाबादपासून 75, जळगावच्या  चाळीसगावापासून 20 आणि कन्नड शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला पाहिल्यास पर्यटकांना सातमाळ्याचा डोंगर दिसतो. विशेष म्हणजे याच डोंगरातून नागद नदी उगम पावते आणि याच नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. तर भर उन्हाळ्यात सुद्धा  नागद तलावात पाणी कायम राहते. त्यामुळे वन्यजीव उन्हाळ्यात या ठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात. तर घनदाट जंगल आणि निसर्गाने मुक्त हाताने केलेली सौंदर्याची उधळण या ठिकाणी पाहायला मिळत असल्याने पर्यटकांची गर्दी असते. मात्र, आता यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

पर्यटनस्थळी गर्दी वाढली... 

मागील काही दिवसांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. लेण्या, धबधबे, धर्मिक स्थळे, एतेहासिक स्थळ, किल्ले यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्यात अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, पाणचक्की, वेरूळ मंदिर, औरंगाबाद बुद्ध लेण्या या ठिकाणी पर्यटक येत असतात. 

काळजी घेण्याचे आवाहन... 

पर्यटनस्थळावर गेल्यावर अनेकांना फोटो घेण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र यावेळी अनेकजण जीव धोक्यात घालून फोटो काढतात. विशेष म्हणजे स्लेफीच्या नादात अनेकजण धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. चार दिवसांपूर्वी असाच एक प्रकार समोर आला होता. अजिंठा लेणीसमोर असलेल्या (व्ह्यू पॉईंट) धबधब्याच्या ठिकाणी एक तरुण दोन हजार फुट खाली कुंडात पडला होता. मात्र, पोहता येत असल्याने त्याने कसे तरी कुंडातील कपारीला पकडून आपला जीव वाचवला. त्यामुळे पर्यटनस्थळी गेल्यावर काळजी घेण्याचं गरजेचं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Aurangabad News : सेल्फीचा नाद नडला! पर्यटक तरुण थेट लेणीच्या दोन हजार फूट कुंडात पडला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget