Nashik Accident : नाशिक ग्रामीणचे रस्ते कि मृत्यू मार्ग! बड्डे पार्टीला गेलेल्या कारचा अपघात, तरुणीचा मृत्यू
Nashik Accident : नाशिक (Nashik) शहर परिसरातील गिरणारे - गंगापूर रोडवरील (Gangapur Road) महादेव पुरच्या पुढे कारचा भीषण (Accident) अपघातात तरुणीचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहेत.

Nashik Accident : नाशिक (Nashik) शहर परिसरातील गिरणारे - गंगापूर रोडवरील (Gangapur Road) महादेव पुरच्या पुढे कारचा भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक परिसरात अपघातांचे (Road accident) प्रमाण वाढले आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील कुटुंबियांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता गंगापूर रोडवर इर्टीगा कारचा भीषण अपघात झाला आहे.
नाशिक येथून गिरणारे (Girnare) जवळील कश्यपी धरणावर (Kashyapi Dam) बड्डे पार्टी साठी सात मित्र मैत्रिणी गेले होते. बड्डे पार्टी हुन परततांना दुगावच्या पुढे ट्रकला हुलकवणी देत असतांना इर्टीगा सरळ बाजूच्या सिमेंटच्या कठड्याना तोडत पुढे गेली. यात कारचा चुराडा झाल्याचे पाहायला मिळाले. गाडीत सातही जण गंभीर जखमी झाले असून यातील एक युवतीच्या मृत्यू झाला आहे.
हेमंत गायकर, वैष्णवी मंडळकर, तन्वीर मंसुरी, विकास हातांगळे, नेहा सोनी, अतीश छिडे हे सहा जखमी झाले आहेत. तर कोमल सिंग या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातामुळे पुन्हा एकदा नाशिकचे रस्ते अपघातांना आमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे.
नाशिक ग्रामीणचे अपघात कधी थांबणार?
एकीकडे नाशिक ग्रामीणचे रस्त्यांची चाळण झाली असून अशातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नाशिकच्या गंगापूर गिरणारे रोड हा अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक सचिन पाटील या नाशिक ग्रामीणच्या रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट ची पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. तसेच राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण चर्चा करून अपघातांना आळा बसविण्यासाठी उपाययोजना अंमलात आणल्या जाणार होत्या. मात्र फक्त ब्लॅक स्पॉटची पाहणी कागदावरच राहते की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
