Raosaheb Danve : '2014 पर्यत गरिबी हटली नाही, सारे गरीब एकत्र झाले, अन् गरिबांचा प्रधान मंत्री झाला' : मंत्री रावसाहेब दानवे
Raosaheb Danve : 2014 पर्यंत देशात (India) विकास कुठेच नव्हता. अनेक भागात नुसतीच गरिबी होती. मात्र त्यानंतर देशातील सर्व गरीब एकत्र आले अन देशात गरिबांचा पंतप्रधान (PM Narendra Modi) झाला.
Raosaheb Danve : 2014 पर्यंत देशात विकास कुठेच नव्हता. अनेक भागात नुसतीच गरिबी होती. मात्र त्यानंतर देशातील सर्व गरीब एकत्र आले अन देशात गरिबांचा पंतप्रधान झाला. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गरिबी हटाव चा नारा दिला. अन भारत सुजलाम सुफलाम झाल्याचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
मंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी नाशिकमध्ये (Nashik) होते. त्यांनी भगूर (Bhagur) येथील वीर सावरकर यांच्या सावरकर वाड्याला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, तिरंगा झेंडा आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला बघतो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच घरांवर तिरंगा फडकला पाहिजे अशी संकल्पना मांडली आणि आज घरांघरांवर तिरंगा (Har Ghar Tiranga) फडकत आहे. स्वतंत्र मिळवण्यासाठी सर्वांनीच बलिदान दिले, घरदार सोडलं, संसाराची राख रांगोळी झाली, अशांनी बलिदान दिले, त्यांचीही आठवण काढली पाहिजे, लोकांच्या पुढे त्यांचं बलिदान मांडल पाहिजे, त्यासाठी हार घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. याच साठी आज नाशिकमध्ये चिमुकल्यासह सर्वच जण तिरंग्यासाठी फेरीत सहभागी झाले आहेत.
ते पुढे म्हणाले आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत. मात्र देशातील गरिबी नरेंद्र मोदींच्या काळात कमी झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत भारतात गरिबी होती. त्यानंतर देशातील यांनी एकत्र यायचं ठरविले. आणि सर्व गरीब एकत्र झाल्यानंतर देशात गरिबांचा प्रधान मंत्री झाला. 2014 पर्यत गरिबी हटली नाही, त्यानंतर सर्व गरीब एकत्र झाले, नरेंद्र मोदींसारखा गरीब पंतप्रधान झाला.. त्यानंतर भारतातून प्रत्येक घर विकसित होऊ लागलं आहे. प्रत्येक घरात शिक्षण मिळू लागले आहे. त्यामुळे रोजगार मिळू लागला आहे. परिणामी गरिबी देशातून हद्दपार होते आहे. असा विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केला.
हर घर तिरंगा मोहीम
तिरंगा झेंडा आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला बघतो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच घरांवर तिरंगा फडकला पाहिजे अशी संकल्पना मांडली आणि आज घरांघरांवर तिरंगा फडकत आहे. इतिहासाची उजळणी करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळं मोदींनी ही संकल्पना मांडली, त्या त्या गावातले स्वातंत्र्य सैनिकांचे सन्मान करण्यास सांगितले आहे. शिवाय सर्व केंद्रीय मंत्री भेट देत आहेत, आपल्या देशाचा मंत्री स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येक पुढे ठेवत आहे. वीर स्वातंत्र्यवीर सारखे वीर जन्माला आले नसते तर आजही आपण गुलामीत असतो, ज्यांनी ज्यांनी देशासाठी काम केलं, त्यांचे विचार स्फूर्ती आपल्या तरुणांपर्यत पोहचवणे आवश्यक आहे. मागील 75 वर्षांत काय गमावलं, काय नुकसान झालं, याचा लेखा जोखा मांडणं आवश्यक असल्याने हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे.
हे गरिबांच सरकार
2014 पर्यत गरिबी हटली नाही, त्यानंतर सर्व गरीब एकत्र झाले, नरेंद्र मोदींसारखा गरीब पंतप्रधान झाला. आपल्या देशात 80 कोटी लोक गरीब आहेत, मात्र मोदी सरकार आल्यानंतर गरिबी हटण्यास मदत झाली. रेशन धान्याच्या माध्यमातून गोरगरिबांना केंद्र सरकार देत आहे. कोरोना काळात सुरु झालेली मोफत अन्न धान्य योजना आजही चालू आहे. एकदा आपण मग वळून पाहिलं पाहिजे, हा देश आपल्याला खूप पुढे न्यायचा आहे, पहिल्या भाषणात मोदींनी सांगितलं की माझं सरकार गोर गरिबांसाठी आहे.