एक्स्प्लोर

Nashik News : नाशिककरांनी अनुभवली पहिल्या पावसाची पहिली झलक, बत्तीही गुल

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलीय. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना (Nashik) अखेर पावसाने दिलासा दिला. दुपारपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या (Nashik Rain) सरींनी नाशिककरांना सुखद अनुभूती दिली. 

नाशिक शहरातील  कामटवाडे, पवन नगर, अंबड लिंक रोड, राजीव नगर, पाथर्डी फाटा, कॅनडा कॉर्नर, उत्तम नगर, महात्मा नगर, सिडको, पंचवटी, औरंगाबाद रोड, जेल रोड, म्हसरुळ, बारदान फाटा, नाशिकरोड या परिसरात पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलीय. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. गारपीट झाल्यानं शेतातील उभ्या पिकांना फटका बसणार आहे. 

बत्ती गुल

सायंकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक भागात वीज गेली. जेलरोड, नाशिकरोड, सिडकोतील काही परिसरात पाऊस आल्याने बत्ती गुल झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळी उकाडा, सायंकाळी पाऊस

दरम्यान नाशिकमध्ये सकाळी बारा वाजेपर्यंत उकाडा जाणवत होता. मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. सायंकाळी नाशकात पहिल्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी विलंब होत असल्याचे स्पष्ट केले होते. पुढील 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याची माहिती आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.

चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. चांदवड परिसरात माजी आमदार शिरीष कोतवाल हे अचानक पाऊस सुरू झाल्याने कांदा शेडमध्ये थांबले असतांनाच वादळी वाऱ्यामुळे शेड पडले त्यात ते किरकोळ जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मौजे संसारी येथील सविता बाळासाहेब गोडसे वय 40 यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या मयत झाल्या आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget