(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Dam Update : नाशिकचे गंगापूर धरण 87 टक्क्यांवर, अजूनही पाच धरणे 50 टक्क्यांच्या खाली, दोन शून्यावरच
Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणातील पाणीसाठा 87 टक्क्यावर, गतवर्षींपेक्षा 13 टक्क्यांनी वाढ, मात्र बहुतांश धरणे तळाशीच, असा आहे जलसाठा?
Nashik Dam Update : नाशिक (Nashik) जिल्हा वाशियांसह मराठवाड्याचे लक्ष लागून असलेल्या गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाणीसाठा 87 टक्क्यावर पोहोचला असून त्यामध्ये गतवर्षीपेक्षा 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय आणखी सहा धरणात देखील गतवर्षापेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश धरणांनी अद्याप तळ गाठलेला असून गतवर्षांपेक्षा तब्बल 24 टक्के उपयुक्त पाणीसाठा अजूनही कमीच आहे.
पावसाचा हंगाम (Rainy Season) सुरू होऊन सव्वादोन महिने उलटूनही जिल्ह्यातील (Nashik District) धरणे काठोकाठ भरू शकली नाहीत. 65 हजार 664 दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची साठवून क्षमता असली तरी सद्यस्थितीत या धरणांमध्ये 45 हजार 335 दशलक्ष घनफूट म्हणजे एकूण क्षमतेचे 61 टक्केच पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत 55 हजार 729 दशलक्ष घनफळ म्हणजे 85 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. धक्कादायक म्हणजे अजूनही तिसगाव, नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडीच असून त्यामध्ये पाणीच उपलब्ध होऊ शकले नाही, जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असलेले गिरणा धरण गतवर्षी आत्तापर्यंत 91 टक्के भरले होते, यांना त्यात केवळ 35 टक्केच पाणी आहे.
राज्यामध्ये एकीकडे मान्सूनचा दमदार (Mansoon) आगमन झालेला असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्याला मात्र अद्यापही मुसळधार आणि दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. सुदैवाने गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर, पालखेड, पुणेगाव, केळझर, कडवा या धरणात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे. परंतु उर्वरित धरणांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. घोटी, इगतपुरी तालुक्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने दारणा धरण समूहाच्या धरण साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जोरदार पावसामुळे भावली पाठोपाठ इतरही धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. सलग पाचव्या वर्षीही हे धरण भरल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र धरण भरण्यात जवळपास पंधरा दिवस उशीर झाला.
असा आहे आजपर्यंतचा जलसाठा
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात फक्त 87 टक्के पाणीसाठा सध्या आहे. कश्यपी धरणात 52 टक्के, गौतमी धरणात 54 टक्के, पालखेड धरण 71 टक्के, पुणेगाव धरणात 92 टक्के पाणीसाठा आहे. तर दारणा धरणामध्ये 93 आणि भावली 100 टक्के एवढा पाणीसाठा आहे, वालदेवी 100 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 92 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 टक्के असा धरणसाठा उपलब्ध आहे. तर दारणा धरणातून 1250 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. भावली डॅममधून 135 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. वालदेवी 65 क्युसेक, कडवा 336 क्युसेक, नांदुरमध्यमेश्वर 1211 क्युसेक, चणकापूर 1246 क्युसेक, हरणबारी 846 क्युसेक, केळझर 198 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :