एक्स्प्लोर

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यास 2 ऑगस्टपर्यंत पावसाचा कोणताही अलर्ट नाही, नाशिककरांना अजून प्रतीक्षाच 

Nashik Rain Update : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाची (Rain) प्रतीक्षा अजूनही आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाची (Rain) प्रतीक्षा अजूनही आहे. दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात रविवारपासून पाऊस विश्रांती घेणार असल्याची स्थिती आहे. कारण हवामान खात्याकडून कुठलाही इशारा पुढील आठवडाभर दिलेला नाही. 

राज्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात पुरपरिस्थिती उद्भवली आहे. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने नाशिकला हुलकावणी दिली आहे. ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  शनिवारी दिवसभरात हलक्या सरींचा दुपारी काही मिनिटांचा शिडकाव्याचा अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली होती. दुपारी नागरिकांना सूर्यदर्शनही घडले. दरम्यान, गंगापूर धरणातून (Gangapur Dam) शुक्रवारी करण्यात आलेला विसर्गही शनिवारी थांबवण्यात आला.

दरम्यान काल दिवसभरात शहरात केवळ 1 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. नाशिक शहरात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु होती. गुरुवारी आणि शुक्रवारीही पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली होती. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 24 तासांत केवळ 4.3 मिमी पावसाची नोंद शहरात करण्यात आली. गरुवारी दिवसभरात 5.6 मिमी इतका पाऊस मोजला गेला होता. गेल्या मंगळवारी 8.9 मिमी इतका त्या आठवड्यातील सर्वाधिक पाऊस शहरात झाला. या हंगामात अद्यापपर्यंत शहरात केवळ 217 मिमी इतका पाऊस झाला आहे.

धरणांचा विसर्ग घटला

गंगापूर धरणातून शुक्रवारी 539 क्युसेकने विसर्ग गोदावरीत करण्यात आला होता. मात्र, शनिवारी दुपारी 1 वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णत: विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग थांबवण्यात आला. त्याचप्रमाणे दारणा धरणातूनही होणारा विसर्ग कमी करण्यात आला असून, शनिवारी संध्याकाळी थेट 1250 क्युसेकवर आणण्यात आला. तसेच नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुरु असलेला विसर्गही शनिवारी रात्री दहा वाजता 3 हजार 155 क्युसेक करण्यात आला.

नाशिकला दमदार पावसाची प्रतिक्षा

पावसाचा दुसरा महिना उलटत चालला असून अद्यापही नाशिक जिल्ह्यावर पावसाची अवकृपा असल्याचे चित्र आहे. मात्र इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर , सुरगाणा, पेठ आदी तालुक्यात बरा पाऊस असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. भात लावणीची लगबग सध्या या तालुक्यात सुरु आहे. पण तरीही नाशिक शहरासह इतर तालुक्यात अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून नाशिककरांना सध्या मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik News : गंगापूर धरणातून पहिल्यांदा 539 क्यूसेकने विसर्ग सुरू, त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार, नाशिकवर अवकृपाच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Clarification :  निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्बMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Embed widget