(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये 100 कोटींचा जीएसटी घोटाळा? भंगार व्यापाऱ्यांकडून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक
Maharashtra Nashik News : नाशिकममध्ये भंगार व्यापाऱ्यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. बनावट कागदपत्रांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Nashik News : नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्यांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा झाला असल्याची माहिती मिळत आहे. बनावट कागदपत्रांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक झाल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. कामगारांच्या नावे बनावट कंपन्या दाखवत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सध्या या घोटाळ्याच्या चर्चा संपूर्ण नाशकात पसरल्या असून खळबळ माजली आहे.
नाशिकममध्ये भंगार व्यापाऱ्यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. बनावट कागदपत्रांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. भंगार व्यापाऱ्यांनी कामगारांच्या नावे बनावट कंपन्या दाखवत घोटाळा केल्याचा आरोप आहे. 200 कोटींहून अधिक व्यवसाय दाखवून 20 कोटी रुपयांचं जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट पदरात पाडल्याचं उघडकीस आलं आहे.
नाशिकमध्ये भंगार आणि स्टील विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील बड्या व्यावसायिकांना बनावट कागदपत्रांद्वारे 20 कोटींचा आयटीसी मिळवत शासनाची फसवणूक केली असल्याचा संशय आहे. हा घोटाळा तब्बल 100 कोटींपर्यंत जाणार असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. बनावट कागदपत्रांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामगारांना अंधारात ठेवून त्यांच्याच नावावर बनावट कंपन्या दाखवून तब्बल 20 कोटी रुपयांचा जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यात आलं आहे. याप्रकरणी केंद्रीय आणि राज्य जीएसटीच्या नाशिक आयुक्त कार्यालयानं हा घोटाळा उघडकीस आणून संशयितांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु, संशयितांनी चौकशी टाळण्यासाठी थेट न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व फेटाळला आहे.
दरम्यान, जीएसटी घोटाळा करणाऱ्या या तिनही व्यापाऱ्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तपास पथकानं हा घोटाळा फार गंभीर असून खूप मोठा असल्याचं सांगत अटकपूर्व जामिनासाठी आक्षेप घेतला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :