Vasant More : राज ठाकरे माझी अडचण समजून घेतील, मला सर्वच पक्षांकडून ऑफर्स : वसंत मोरे
मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. हकालपट्टी केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली आहे.
Vasant More : पुणे शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. हकालपट्टी केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र, मी राज ठाकरेंसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज मोरे राज ठाकरेच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे माझी अडचण समजून घेतील अशी अपेक्षा वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात माझ्याबद्दल राज ठाकरेंना खुपच विचित्र माहिती दिली आहे. राज ठाकरेंनी त्याबद्दल विचारल्यावर मी ते सांगणार आहे. मशिदींसमोर भोंगे लावण्याने माझ्या प्रभागात अडचण होतेय, हे देखील मी राज ठाकरेंना सांगणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. राज ठाकरेंचा आदेश आहे की भोंगे लावा. पण माझी अडचण ते समजून घेतील ही अपेक्षा असल्याचे मोरेंनी संगितले. मला सर्वच पक्षांकडून ऑफर्स आहेत, पण या ऑफर्स आजच आहेत असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून मी तणावामधे आहे. मला नीट झोपही लागत नाही. राज ठाकरे काही बोलतील, चिडतील वगैरे याबबद्दल धाकधूक असल्याचे ते म्हणाले. अनेकदा ते कौतुकाची थाप देतात तसं रागावतात देखील, पण पुण्यातील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी माझ्याबद्दल जे सांगीतलय त्यामुळे मी तणावात असल्याचे मोरेंनी सांगितले. वसंत मोरे यांना अखेर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळाली आहे. वसंत मोरे हे आज मुंबईत शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. सकाळी 11 वाजता ही भेट होईल. महत्त्वाचं म्हणजे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर रविवारी राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाली आहे. त्यामुळे आता या बेटीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- वसंत मोरे यांच्या मेसेजला अखेर राज ठाकरे यांचा प्रतिसाद, आज सकाळी अकरा वाजता 'शिवतीर्थ'वर भेट
- मागील तीन दिवसांत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेसकडून ऑफर; पण...: वसंत मोरे