Nashik News: नाशिकमध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई; सहाय्यक निबंधकांनी स्वीकारली 20 लाखांची लाच
Nashik Crime News: नाशिक शहरासह जिल्ह्यातील लाचखोरी सर्वश्रुत असून दिवसेंदिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाया होत असताना सरकारी अधिकाऱ्यांकडून सर्रास लाच घेतली जात आहे.
Maharashtra Nashik Crime News: नाशिकमध्ये (Nashik News) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) महत्वाची कारवाई केली असून या वर्षातील (Crime News) सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. निबंधक कार्यालयातील सहाय्यक तालुका निबंधकासह वरिष्ठ लिपिकास 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
नाशिक शहरासह (Nashik Crime News) जिल्ह्यातील लाचखोरी सर्वश्रुत असून दिवसेंदिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाया होत असताना सरकारी अधिकाऱ्यांकडून सर्रास लाच घेतली जात आहे. कुणालाही न जुमानता अधिकारी लाच स्वीकारत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशातच नाशिकमधील सहाय्यक निबंधक रणजित महादेव पाटील आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीरनारायण यांना तब्बल वीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सावकारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याचा मोबदल्यात लाच स्वीकारली आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने सावकारी कायद्या संदर्भातील गुन्हा दाखल न करण्याचे सांगितले होते. लाचखोर सहाय्यक निबंधक रणजित पाटील याने 20 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार रक्कम देण्याचे ठरल्यानंतर एसीबीने देखील पडताळणी करत ठोस असल्याचे एसीबीच्या निदर्शनास आले. त्यानुसार सापळा रचून कामगिरी करण्याचे ठरले. त्यानुसार लाचखोर तक्रारदारकडून 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. यात वरिष्ठ लिपीक प्रवीण अर्जुन वीरनारायण याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात लाचखोर निबंधक पाटील आणि लिपीक वीरनारायण हे अडकले आहेत. त्यांनी 20 लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांची आता कसून चौकशी सुरू असून त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान लाचखोरीच्या या मोठ्या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये सावकारीचा फास
नाशिक शहरात खासगी सावकारीने ऊत आला असून काही दिवसांपूर्वी सावकारीमुळे अनेकांनी स्वतःला संपविल्याचे उघड झाले आहे. सातपूरच्या अशोक नगर परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांनी आपले जीवन संपवले आहे. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 20 सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सहकार विभागानेही सावकारांविरुद्ध मोहिम उघडली आहे. आणि आता या मोहिमेअंतर्गतच कारवाई न करण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची लाच घेताना तालुका सहाय्यक निबंधक व वरिष्ठ लिपीक जाळ्यात अडकले आहेत.