एक्स्प्लोर

Nashik News : ‘नाशिक होणार एज्युकेशन हब’, दिंडोरीत पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे भूमिपूजन

नाशिकमध्ये एज्युकेशन हब निर्माण व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी नाशिक मध्ये होत असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिक कनेक्ट करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच येथील नाविन्यपूर्ण अध्यासन केंद्रांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी प्राधान्य असेल असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे तर मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले. 

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक उपकेंद्राची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी आणि नाशिकमध्ये या विद्यापीठाचे स्वतंत्र्य कॅम्पस उभारण्यासाठी कित्येक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील होतो. विद्यापीठाचे काम इतके वाढले आहे की, त्याचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न केले. त्यातून आज हे उपकेंद्र उभे राहत आहे याचा आनंद आहे. नाशिक मध्ये अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. मुंबई पुण्यानंतर नाशिकची शैक्षणिक वाटचाल अत्यंत वेगाने सुरु असून देशभरातील तसेच विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिकला येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
2012-13 सालचा प्रोजेक्ट

आगामी काळातील नाशिकचा शैक्षणिक विस्तार व शिक्षणाच्या रुंदावलेल्या कक्षा लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे सक्षमीकरण करून येथे विद्यापीठाचा 'नाशिक कॅम्पस' सुरु करण्याचा  24 जून 2013 रोजी निर्णय घेतलेला होता. विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यावेळी उच्च-शिक्षण मंत्री होते. 2014 साली या उपकेंद्रासाठी मौजे शिवनई येथील 62 एकर जागा निश्चित करण्यात आली होती. पण नंतरच्या पाच वर्षात या उपकेंद्राचे काम रखडले. आज अखेर कॅम्पसचा भूमीपुजन सोहळा पार पडला.

नाशिकला एज्युकेशन हब बनवायचं! 

नाशिकमध्ये एज्युकेशन हब निर्माण व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी नाशिक मध्ये होत असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अतिशय महत्वाचे ठरणार आहे. युजीसी व एआयसीटीईच्या माध्यमातून विविध शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करून मोफत शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच शहराची वाढती शैक्षणिक गरज लक्षात घेऊन केंद्रीय विद्यालयांची निर्मिती. तसेच केंद्र शासनाच्या व्यवसायाभिमुख केंद्रीय महाविद्यालयांची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे आधुनिकीकरण करून येथे तज्ज्ञ शिक्षक, ऑडीओ व्हिज्युअल वर्ग, सुसज्ज वाचनालये निर्माण करण्यात येऊन ‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन भुजबळ यांनी केले. 

सावित्रीबाईंचे विचार तळागाळापर्यंत...

ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ चालवले जात आहे. त्या सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील खालच्या घटकापर्यंत पोहचवायचे असतील तर त्याचा एकमेव मार्ग हा शिक्षण असल्याचे सांगत जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्याला घ्यायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मजबुतीने उभे रहावे. देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाचे असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget