Nashik News : नाशिकमधील तृतीयपंथीयांसाठी गुड न्यूज! लवकरच मिळणार 'मानधन'? विभागीय आयुक्तांची माहिती
Nashik News : विभागीय आयुक्तांनी सांगितले, तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करावी.

Transgender will get honorarium : राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. त्याच बरोबर नाशिक विभागातील तृतीयपंथीयांना 'मानधन' देण्याच्या निर्णय विचाराधीन असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक
दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी जातीवाचक नावे हद्दपार करण्यात येत आहेत. तसेच नाशिक विभागात तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून काल अखेर 1659 जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आले आहे. तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ समितीतर्फे महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते.
तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, विभागातील शहरी क्षेत्रातील 190 नावे बदलण्यात आली आहेत तर ग्रामीण भागातील 1459 जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत. विभागातील शहरी भागात महानगरपालिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही नावे बदलण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. तसेच या आढावा बैठकीत तृतीयपंथीय समाजबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले. या कल्याण मंडळाचा देखील आढावा घेण्यात आला.
तृतीयपंथीयाना येणा-या अडचणी व सामाजिक प्रश्न
तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करावी. तसेच पुणे महानगरपालिका प्रशासनाने रुपये 3 हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर विभागातील महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून विचार करण्यात येईल, असेही गमे यानी यावेळी सांगितले. विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी विभागीय समितीच्या सदस्य शमिभा पाटील (जळगाव) यांनी तृतीयपंथीयाना येणा-या अडचणी व सामाजिक प्रश्नाबाबत उपस्थितांना माहिती करुन दिली. तर कोरोना लसीकरणाबाबत नाशिक विभागात एकूण 603 तृतीयपंथीयांची संख्या असून त्यापैकी 363 तृतीयपंथीयांना कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
