एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : अपक्ष निवडणूक लढणाऱ्या पुतण्याच्या विजयाची छगन भुजबळांना गॅरंटी! म्हणाले, 'नांदगावकरांचा कल समीरच्या बाजूनं, यंदा विजय निश्चित!'

Chhagan Bhujbal on Sameer Bhujbal : नांदगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नाशिक : नांदगावची (Nandgaon) लोकं दहशतवादाला खूप कंटाळले आहेत. भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी त्यासाठीच दिली आहे. सध्याचा नांदगावकरांचा कल समीर भाऊंच्या बाजूने झुकतो आहे. त्यामुळे त्यांचा विजय मला निश्चित वाटतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhhagan Bhujbal) यांनी केले आहे. 

विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असून दिवाळीचा सण देखील आहे. या निमित्ताने यंदाची दिवाळी नेमकी कशी छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, दिवाळीचा आनंद लहानपणी होता तो आता नाही.  ज्या चाळीत मी राहिलो तिथे आम्ही दिवाळीत वेगवेगळे पदार्थ बनवायचो. आम्ही एकमेकांना फटाक्यांची देवाणघेवाण करून वाजवायचो. दिवाळी अंकात आम्ही वेगवेगळे विषय वाचायचो. आधीची दिवाळी आता राहिली नाही. सार्वजनिक गणपतीसारखी सार्वजनिक दिवाळी आधी आम्ही साजरी करत होतो, आता ती घरापुरतीच मर्यादित राहिली आहे. आता लहान-लहान मुलं फटाके फोडत असताना ते पाहायला खूप आनंद वाटतो.  यंदाची दिवाळी फारच वेगळी आहे, निवडणुकीतील उमेदवारांना मला वाटत नाही दिवाळीचा आनंद घेता येईल, असे त्यांनी म्हटले. 

पाच तारखेनंतर खरे राजकीय फटाके वाजतील

सर्व राजकीय पुढार्‍यांच्या घरी आता तेच सुरू आहे. कोणाची माघारी घ्यायची? निवडणुकीत काय करायचं? पूर्वी आम्ही दिवाळीचं कार्ड प्रत्येकाच्या घरी पाठवायचो, आता फक्त फोनवरच शुभेच्छा पाठवतो आणि एकमेकांची भेटही होत नाही.  दिवाळी सण हा देशासह जगात साजरा व्हायला लागला आहे.  अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसमध्ये देखील दिवाळी साजरी होते.  सर्व धर्मीयांमध्ये दिवाळी सण साजरा केला जातो. यंदाची दिवाळी इलेक्शन दिवाळी आहे. चार दिवस फक्त निवडणुकीवरच सर्वांच्या घरात चर्चा सुरू असतील. पाच तारखेनंतर खरे राजकीय फटाके वाजतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

निकालानंतर महायुतीसाठीच दिवाळी गोड असणार

आठवणीतली दिवाळी हीच होती की फुटलेले फटाके गोळा करून एकत्र करायचं आणि तो आनंद वेगळाच होता. राजकीय जीवनात देखील दिवाळी ही आनंदाची होती, आता दिवाळीचा आनंद हा स्वतःपुरताच उरलेला आहे. लहानपणीच्या दिवाळीचा आनंद आता संपलेला आहे. सध्या फक्त दिवाळीची औपचारिकता बाकी आहे. दिवाळीत नवीन कपडे आणि काहीतरी नवीन करायचं पण आता तसे उरले नाही.  निकाल लागत नाही तोपर्यंत सर्वांसाठी दिवाळी गोड आहे. निकालानंतर महायुतीसाठीच दिवाळी गोड असणार हे शंभर टक्के आहे, असेही त्यांनी म्हटले.

नांदगावमध्ये जे घडलं ते समीर भुजबळ यांच्या फायद्याचेच

नांदगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, समीर भुजबळ जरी अपक्ष उमेदवार करत असेल तरी कुटुंब म्हणून आम्ही उद्या लक्ष्मीपूजनासाठी एकत्र येणार आहोत. निवडणुकीत शिव्या आणि दादागिरी केली तर कायदा आपलं काम करेल. नांदगावमध्ये जे घडलं ते समीर भुजबळ यांच्या फायद्याचेच असणार आहे.  समीर भुजबळ यांना उभे राहण्याआधी मी सांगितलं होतं की, राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल.  समीर भुजबळ यांनी राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. 

नांदगावकरांचा कल समीर भाऊंच्या बाजूनं

नांदगावची लोकं दहशतवादाला खूप कंटाळले आहेत. भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीर भुजबळ यांनी त्यासाठीच दिले आहेत.  ऑडिओ आणि व्हिडिओमुळे जगासमोर आली आहेत की, नांदगावमध्ये किती दहशत आहे. सध्याचा  नांदगावकरांचा कल समीर भाऊंच्या बाजूने झुकतो आहे. त्यामुळे त्यांचा विजय मला निश्चित वाटतो आहे, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. 

आणखी वाचा 

समीर भुजबळांना देखील घड्याळाची निषाणी देता आली असती, पण....नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Embed widget