धक्कादायक! अवघ्या 50 रुपयांच्या वादातून नाशिकमध्ये मजुराची हत्या, पंचवटी पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात
नाशिकच्या (Nashik) पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळं परिसरातएकच खळबळ उडाली होती.
Nashik Crime News : नाशिकच्या (Nashik) पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळं परिसरातएकच खळबळ उडाली होती. शांतीलाल ब्राह्मणे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) अधिकचा तपास केला असता, आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत एका मजुराने दुसऱ्या मजुराच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे एकमेकांना ओळखीत होते. या दोघांमधील एकाला 200 रुपये तर दुसऱ्याला 150 रुपये दिवसाला पगार मिळत होता. याच कारणावरुन झालेल्या वादातून शांतीलाल ब्राम्हणे यांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. संतोष अहिरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.
गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिस प्रशासन सतर्क
अलिकडच्या काळात राज्यातील काही भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये देखील असे गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. अशा घटनांमधील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Satara Crime : फलटणमध्ये ऊसाच्या शेतात भयानक अवस्थेत आढळलेला मृतदेह कोणाचा? पोलिसांसमोर मोठं आव्हान, मिसिंग महिलांचा शोध, आत्तापर्यंत काय-काय घडलं?























