Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Kavita Raut : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. मात्र सरकारच्या निर्णयाविरोधात कविता राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (International Runner Kavita Raut) यांना राज्य सरकारकडून सरकारी नोकरी (Government Job) देण्यात आली. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर कविता राऊत नाराज आहेत. 10 वर्षांपासून संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याचा दावा कविता राऊत यांनी केला आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक पदाचे नियुक्ती पत्र राज्य सरकारकडून दिले जात आहे. कविता राऊत यांच्यासह आणखी 15 जणांना सरकारी नोकरी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या नियुक्ती पत्रावर कविता राऊत नाराज आहेत. 10 वर्षांपासून संघर्ष करूनही न्याय मिळत नाही. राज्य सरकारच्या धोरणा विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती कविता राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
अर्थ खात्यात फाईल अडवली जात असल्याचा आरोप
राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाऊन कविता राऊत दाद मागणार आहेत. माझ्या बरोबर ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या ललिता बाबरला एक न्याय आणि मला दुसरा का? असा सवाल पुन्हा एकदा कविता राऊत यांनी उपस्थित केला आहे. दहा वर्षांपासून अनेक खात्यात नोकरीची फाईल पुढे जाते. मात्र, अर्थ खात्यात फाईल अडवली जात असल्याचा गंभीर आरोपही कविता राऊत यांनी केला आहे.
उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे
आताचे पद 2018 च्या जीआरनुसार आहेत. मात्र, आमचे प्रकरण त्याआधीचे असल्यानं जुन्या जीआरनुसार उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे, अशी अपेक्षाही कविता राऊत यांनी व्यक्त केली आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कविता राऊत यांचा अर्जुन पुरस्काराने झालाय गौरव
दरम्यान, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कविता राऊत यांनी भारताला पदकं मिळवून दिली आहेत. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक (Rio Olympics) स्पर्धेत भारताकडून तिनं सहभाग घेतला होता. तसेच कविताला खेळाडूंसाठी देण्यात येणार अर्जुन पुरस्कारही देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik News : नाशिकच्या खेळाडूंना मिळणार क्लास वन पोस्ट, 'ही' नाव चर्चेत, काय म्हणाले गिरीश महाजन?