एक्स्प्लोर

Hemant Godse : लोकसभेचं तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार का? हेमंत गोडसेंनी सांगूनच टाकलं, म्हणाले...

Hemant Godse : छगन भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी चर्चा होत असल्याने हेमंत गोडसे यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हेमंत गोडसे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Nashik Lok Sabha Constituency : महायुतीत (Mahayuti Seat Sharing) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा गुंता अजूनही सुटला नाहीये. ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीत तीनही पक्षांनी या जागेवर दावा केल्याने अजूनही तिढा सुटलेला नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उमेदवारीची घोषणा होण्याआधीच लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार सुरु केला. तर या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळणार असे संकेत मिळत आहे. 

यामुळे हेमंत गोडसे तडकाफडकी मुंबईला पोहोचले. गोडसेंना उमेदवारी मिळाली नाही तर ते बंडखोरी करण्याच्या तयारी असल्याची चर्चा सुरु होती. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा केल्यानंतर हेमंत गोडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.  

नाशिकची जागा शिवसेनेचीच 

हेमंत गोडसे म्हणाले की, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, पारंपारिक जागा आपल्यालाच मिळावी यासाठी चर्चा करण्यात आली. महायुतीचा उमेदवार जिंकेल यासाठी सगळे पक्ष प्रयत्न करू. माझा सूर बदललेला नाही, असे त्यांनी म्हटले. 

नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्रीही आग्रही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिले का? अशी विचारणा केली असता हेमंत गोडसे म्हणाले की, ही जागा पारंपारिकरीत्या शिवसेनेची असल्यामुळे आपली देखील नाशिकच्या जागेबाबत आग्रही मागणी की ही जागा शिवसेनेला सुटावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

अपक्ष निवडणूक लढवणार का? गोडसे म्हणाले...

दबावामुळे ही जागा जर तुम्हाला मिळाली नाही आणि युतीधर्माचे पालन करण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार का? अशी विचारणा केली असता हेमंत गोडसे म्हणाले की, मोदी सांगताय महाराष्ट्रात चारशे पार आणि महाराष्ट्रात 45 पार. त्यामुळे त्यांना महायुतीतला एक एक खासदार महत्वाचा आहे. म्हणून इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

नाशिकचा निर्णय सकारात्मकपणे होईल - हेमंत गोडसे

तुम्ही दोन वेळा निवडणूक आलेले आहात. मात्र तिसऱ्यांदा उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत? असे विचारले असता ते म्हणाले की, काही निर्णय हे राज्यस्तरीय घेतले जातात. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन कुठल्याही पक्षाला न दुखावता हे निर्णय घेतले जातील. पण नाशिकचा निर्णय सकारात्मकपणे होईल, असे त्यांनी म्हटले आहे. महायुतीचा जो कोणी उमेदवार निवडून येणार असेल, अशा उमेदवारासोबत आम्ही राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

Sharad Pawar: शरद पवार संपले म्हणणारे विरोधी पक्षात बसले, आता ते 'डेप्युटी' आहेत; पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही; जयंत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य
आधी सरकार येऊ द्या, मग तुम्हाला हवं त्याला मुख्यमंत्री करा; जयंत पाटलांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Beed : बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump leading : ट्रम्प यांचा 15 राज्यात विजय, 6 राज्यात आघाडीवर तर ९ राज्यात हॅरिसचा विजयAbp Majha Headlines Marathi News 8 Am Top Headlines  06 November 2024Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरीAkbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्य

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही; जयंत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य
आधी सरकार येऊ द्या, मग तुम्हाला हवं त्याला मुख्यमंत्री करा; जयंत पाटलांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Beed : बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
Shivadi Vidhan  Sabha: उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
Sharda Sinha Passes Away: बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget