(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Girish Mahajan : छगन भुजबळ खरंच नाराज आहेत का? गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Girish Mahajan : छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. त्यातच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली.
Girish Mahajan नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भुजबळांच्या भेटीनंतर गिरीश महाजनांनी माध्यमांशी संवाद साधला.
गिरीश महाजन म्हणाले की, आता कुठली नाराजी आहे. मोदींच्या सभेत भुजबळांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. मोदीजींनी कशासाठी पंतप्रधान करायचे आहे. हे त्यांनी सांगितले. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
तटकरेंची चिंता देशमुखांनी करू नये
सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, असा दावा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुख तरी तिथे स्थिरस्थावर आहेत का? तुम्ही तिकडे राहा नाहीतर अजून काही वेगळे विचार तुमच्या मनात येतील. सुनील तटकरेंची चिंता तुम्ही करू नका, असा टोला त्यांनी यावेळी अनिल देशमुखांना लगावला.
छगन भुजबळांचा अनिल देशमुखांना टोला
माझं कोणाशी बोलण झालं नाही, असे तटकरे यांनी मला सांगितले आहे. तुम्ही तुमचं सांभाळा. तुमचे लोक इकडे येणार नाही ते पाहा. त्यांच्यासाठी डिपार्टमेंट राखून ठेवले आहेत, असा टोला छगन भुजबळांनी अनिल देशमुखांना लगावला.
गडकरांच्या सभेला भुजबळ उपस्थित राहणार
नाशिक लोकसभा मतदार संघातील अनेकांना फोन करून नियोजन केले. त्यामुळे बैठक जास्त वेळ सुरू होती. भुजबळ आज गडकरींच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. शेवटचा टप्पा असल्याने आज मुंबईत सभा आहे. त्यासाठी राज ठाकरे हे देखील असतील. दावे प्रतिदावे सुरू असले तरी ४ जूननंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. आमच्याकडे येण्यासाठी अनेकांच्या रांगा लागल्या आहेत.
शांतीगिरी महाराजांची आम्हाला इतर ठिकाणी मदत
तुम्ही शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. भेटीत काय चर्चा झाली असे विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, शांतीगिरी महाराजांनी माघार घ्यावी, अस आमचं म्हणणं होते. मात्र त्यांचे भक्तगण ऐकायला तयार नाहीत. इतर ठिकाणी त्यांची आम्हाला मदत मिळते आहे, असे यावेळी त्यांनी म्हटले.
आणखी वाचा