'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Vijay Wadettiwar : गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची नाशिकच्या भुजबळ येथे भेट घेतली. यावरून विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
!['महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका Vijay Wadettiwar criticizes Girish Mahajan and Chhagan Bhujbal meeting Maharashtra Politics Marathi News 'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/65ca9c45c0bb07c518e1031f87ca58471715934094477923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijay Wadettiwar : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथे दाखल होत छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना महायुतीतून उमेदवारी देण्यात आली. यामुळे भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात होते. छगन भुजबळ हे प्रचारात देखील सहभागी होत नव्हते. त्यामुळे गिरीश महाजन यांनी याआधीदेखील छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर छगन भुजबळ गोडसेंच्या प्रचारात सहभागी झाले होते. नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. मात्र आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे समजले, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
महाजनांकडे लोण्याचं मडकं
यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. महाजन-भुजबळ भेटीवर विजय वडेट्टीवार म्हणाले की, गिरीश महाजनांचे हे कामच आहे. त्यांच्याकडे दूध, दही आणि लोणी खूप आहे. ज्यांना जिथे गरज पडली ते तिथे लोण्याची कटोरी घेतात आणि लोणी घेऊन दरवाजात पोहोचतात. जेवढी लोणी लावता येतील तेवढी लावायची आणि त्यांची नाराजी दूर करायची इतकेच काम त्यांच्याकडे आहे. लोण्याने भरलेले मडके त्यांच्याकडे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
काय म्हणाले हेमंत गोडसे?
छगन भुजबळ हे नाराज नसून ते प्रचारात सक्रिय असल्याचे मत शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले. तर साधू म्हणून शांतिगिरी महाराजांचा सन्मान आहे. समविचारी मत विभाजन टाळण्यासाठी शांतीगिरी महाराज काही तरी निर्णय घेऊ शकत होते, मात्र त्यांनी ऐकले नाही तर नाशिकची जनता सुज्ञ आहे. ते मतविभाजन करणार नाही, असे मत हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)