एक्स्प्लोर

Nashik News : ...तर रस्त्यावर नांगर फिरवून शेती करणार; नाशिकच्या शेतकऱ्यांचा पालिका प्रशासनाला गंभीर इशारा

Nashik News : नाशिक मनपाकडून 2002 साली अधिग्रहित केलेल्या जागेचा अद्याप मोबदला न मिळाल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : नाशिक मनपाकडून (Nashik NMC) 2002 साली अधिग्रहित केलेल्या जागेचा अद्याप मोबदला न मिळाल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांनी (Farmers) आक्रमक भूमिका घेतली आहे. जागेच मोबदला तात्काळ न मिळाल्यास तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर नांगर फिरवू असा इशाराही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे. 

सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीने 2002 साली तपोवन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महापालिकेने अधिग्रहित केल्या होत्या. तेव्हापासून शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला न मिळाल्याने स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे (Uddhav Nimse) यांनी तीन आठवड्यापूर्वी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा मोबदला तातडीने द्यावा यासाठी उद्धव निमसे आग्रही आहेत. या आंदोलनावेळी आयुक्त नसल्याने उद्धव निमसे यांनी आज पुन्हा शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर (Ashok Karanjkar) यांची भेट घेतली.

मर्जीतील बिल्डरांनाच भूसंपादनाचा मोबदला मिळाल्याचा आरोप 

शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला मिळाला नसून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बिल्डरांनाच भूसंपादनाचा मोबदला मिळत असल्याचा आरोप उद्धव निमसे यांनी केला आहे. या भूसंपादन प्रकरणी संबंधित विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढू, असे आश्वासन आयुक्त अशोक करंजकर यांनी दिले आहे. 

शेतकऱ्यांना मोबदला देऊ

पुन्हा एकदा खाजगी बिल्डरांना लक्ष करत 30 टक्के रक्कम दिल्याशिवाय महापालिकेतील अधिकारी भूसंपादनाचा मोबदला देत नसल्याचा पुनरुच्चार उद्धव निमसे यांनी केला असून आगामी काळात सर्वच रिंग रोड खोदून काढू, असा इशाराही उद्धव निमसे यांनी दिला आहे. तर मनपा आयुक्तांची भेट घेऊन आमचे समाधान झाले नाही. शहरातील बांधकाम व्यवसायिकांना शेकडो कोटींची वाटप झाले आहे. शिष्टमंडळाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी दिली आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन शेतकऱ्यांना मोबदला देऊ. कोणालाही खाजगी चेक दिले नाही, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.   

उद्धव निमसेंचा महायुती सरकारला घरचा आहेर

दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाकडून भूसंपादनात काही बांधकाम व्यावसायिकांचे भले होत असून शेतकऱ्यांचे भूसंपादन नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत भाजपचे माजी स्थायी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महापालिकेत धडक देत आयुक्तांच्या दालनाबाहेर काही दिवसांपूर्वी ठिय्या आंदोलन केले होते. महानगरपालिकेत 30 टक्के लाच घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, असा आरोप करत भाजपचे तीन आमदार आणि पालकमंत्री दादा भुसे मौन बाळगून असल्याचा आरोप करत निमसे यांनी सत्ताधारी महायुतीला घरचा आहेर दिला होता.

आणखी वाचा 

Amruta Pawar : एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याचं मन इतकं छोटं, अमृता पवारांचं छगन भुजबळांना सडेतोड उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA on Dhananjay Munde Manikrao Kokate : महाराष्ट्र मैं दो ही गुंडे,कोकाटे-मुंडे-कोकाटे मुंडे!Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Sunil Shelke EXCLUSIVE : Rohit Pawar Jayant Patil लवकरच सत्तेत सहभागी होतील; शेळकेंचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 03 March 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
Rohit Pawar : मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन
तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
Embed widget