PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेआधी शेतकरी आक्रमक, कांद्याच्या माळा गळ्यात घालून जोरदार आंदोलन
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेआधीच लासलगावला कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी आंदोलन केला. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
Nashik News : नाशिक (Nashik Lok Sabha Constituency) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या (Dindori Lok Sabha Constituency) निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज नाशिक दौऱ्यावर येत असून पिंपळगाव येथे ते जाहीर सभा घेणार आहे. या सभेकडे देशाचे लक्ष लागलेले असतानाच लासलगावला (Lasalgaon News) कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे.
महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील सभेअगोदरच लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
पोलिसांनी 15 शेतकऱ्यांना घेतले ताब्यात
यावेळी लासलगाव पोलिसांनी (Lasalgaon Police) कांद्याच्या माळांसह 15 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर शेतकरी व्हाट्सअॅप ग्रुप ॲडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण वीस जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तसेच लासलगाव पोलिसांनी मतदानावर (Voting) बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्याची माहिती समोर आली आहे.
...तर सभा कशाला घेत आहात?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधीच शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देत त्रास दिला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandip Jagtap) यांनी केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन पाकिस्तानला घाबरत नाही, तर त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांची भीती आहे का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना सभेला जाऊ देत नसेल तर मग सभा कशाला घेत आहात? शेतकऱ्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास दिला जातोय, असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील सभेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला (Pimpalgaon Bajar Samiti) छावणीचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान ज्या हेलिपॅडवर उतरणार आहे. त्याला चारही बाजूने पोलीस सुरक्षेचा घेरा तैनात करण्यात आला आहे.
आणखी वाचा
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
PM Modi: मोदींच्या सभेपूर्वी नाशिकमध्ये पोलिसांकडून ठाकरे गटाचे पाच शिवसैनिक 'या' कारणामुळे नजरकैदेत