Chhagan Bhujbal : 'लोकांच्या डोक्याला झालंय काय, फेसबुक लाईव्ह करतात अन् अशा घडतात' : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Chhagan Bhujbal नाशिक : मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing) परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या (Abhishek Ghosalkar Firing Case) करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांमधील राज्यातील हत्येच्या सत्रांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, लोकांच्या डोक्याला झालंय काय? मला कळत नाही, फेसबुक लाईव्ह करतात आणि अशा घटना घडतात. यात पोलीस (Police) तरी काय करणार, चोऱ्या दंगल अशा घटनांमध्ये पोलीस संरक्षण देत असतात, इथं तुमच्या घरात येऊन घटना घडतात. पोलिसांनी बंदूक लायसन्स देताना अधिक काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री यात काय करू शकतात?
ते पुढे म्हणाले की, अनेक वाम मार्गाने जाणारे, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना बंदूक देऊ नये. मॉरिस जेलमध्ये होता, त्याच्याकडं बंदूक कसे आलेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गृहमंत्री यात काय करू शकतात. राजीनामा मागणी चुकीचे आहे. आतंकवाद, दंगे, चोऱ्या अशा ठिकाणी गृहमंत्री काळजी घेऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
...तर त्यांचे आरक्षण राहील का?
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गुरुवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. मंडल आयोगालाच चॅलेंज करतो असे त्यांनी म्हटले. यावर छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) द्या या मागणीला आमचा पाठींबा आहे. झुंडशाही आणि बॅक डोअर एन्ट्रीला विरोध आहे. ओबीसी आरक्षण मंडळ आयोगाचा भाग आहे. जर मंडळ आयोग गेला तर त्यांचे आरक्षण राहील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बाबा सिद्धीकी यांच्या येण्याने पक्षाला फायदा
बाबा सिद्धीकी यांच्याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, बाबा सिद्धीकी राज्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या येण्याने पक्षाला फायदा होणार आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी देणार की नाही याची कल्पना नाही. मी सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक आहे, याची कल्पना नाही, असे ते म्हणाले.
आणखी वाचा
वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात 50 पुजाऱ्यांची नेमणूक होणार, किती मिळणार मानधन?