एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत अद्याप कायम आहे. त्यातच आता छगन भुजबळ हे आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत. छगन भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT)  नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये जोरदार प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. तर महायुतीत मात्र अद्याप नाशिकच्या जागेवरून तिढा कायम आहे. 

एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील नाशिकच्या जागेवर दावा केल्याने या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर भाजपकडून देखील नाशिकमध्ये आमची ताकद अधिक असल्याचा दावा करत या जागेची मागणी करण्यात आली आहे.  

छगन भुजबळ नेमकं काय बोलणार? 

आता मंत्री छगन भुजबळ हे महत्त्वाच्या विषयावर आज तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतल्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात ते माध्यमांशी संवाद साधतील.  नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक आहेत. मात्र अद्याप या जागेचा निर्णय झालेला नाही.  त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ नेमकं काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नाशिकची जागा नक्की कुणाला? 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिक लोकसभेवरचा दावा आम्ही सोडला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची एबीपी माझाशी बोलताना दिली होती. तर शिवसेना शिंदे गट देखील नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी ठाम आहे. आता नाशिकची जागा नक्की कुणाला सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेचा तिढा कधी सुटणार? सुनील तटकरेंनी थेट मुहूर्तच सांगितला!

हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या पाया पडले, काळाराम मंदिरात भेट; नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJob Majha : रेल्वे सुरक्षा दलात RPF सब इंस्पेक्टर पदासाठी 452 जागांवर भरती : जॉब माझा ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

Embed widget