एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : शिवसेना आणि मशालीचं जुनं नातं, छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हांवर पहिली निवडणूक लढवली होती!

Shiv Sena Symbol : शिवसेनेनं यापूर्वीही मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी मशाल चिन्हावर विजयी झालेले छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले आमदार होते.

Chhagan Bhujbal Shivsena : अखेर काल निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गटाला 'शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shivsena Uddhav Balasaheb Thackray) असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. याच पार्श्‍वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तत्कालीन ‘मशाल’ चिन्हावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माझगाव विभागातून निवडणूक लढवली होती.शिवाय या निवडणूक ते प्रचंड मताधिक्याने निवडून येत शिवसेनेचे पहिले आमदार देखील झाले होते. 

शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि शिंदे गटात सुरु असलेल्या वाद काही केल्या मिटायचं नाव घेत नसताना अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय देण्यास सांगण्यात आलं होते. त्यानुसार ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या धगधगती मशाल या चिन्हाबरोबर जून नातं असल्याचे समोर आलं आहे. 1985 मध्ये छगन भुजबळांनी या निवडणूक चिन्हावर माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. 

आज शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आले पण यापूर्वी देखील शिवसेनेकडे मशाल हे चिन्ह होते. छगन भुजबळ हे नगरसेवक पदासाठी 1985 साली  उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि ते शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. त्यानंतर एप्रिल मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. त्यात देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते. 1985 साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी चिन्ह होते. "धगधगती मशाल"  या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली आणि मशालीने इतिहास घडविला.

पहिलेच आमदार 
भुजबळ यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली असून, 1991 मध्ये त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी त्यानंतर एप्रिल 1995 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्या वेळी शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले होते आणि शिवसेनेने श्री. भुजबळ यांना महापौर म्हणून संधी दिली. 1981 मध्ये भुजबळ दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर झाले होते. त्यानंतर झालेल्या माझगाव विधानसभा  मतदार संघाच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढवून भुजबळ त्या वेळी शिवसेनेचे एकमेव आणि पहिले आमदार ठरले आहेत. 

भुजबळांच्या पहिल्या आमदारकीचा जाहीरनामा 
छगन भुजबळ हे तासगाव विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते मशाल चिन्ह घेऊन उभे राहिले होते. यावेळी त्यांनी जनतेसाठी एक जाहीरनामा दिला होता. 1972 साली माझगाव विभागातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते. त्यावेळी निवडून आले होते. त्यानंतर 1978 साली महापालिकेची दुसरी निवडणूक झाली.  त्यावेळी देखील भुजबळ प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. या काळात भुजबळांनी अनेक प्रश्नांवर काम केले. बेळगाव कारवार प्रश्न असो किंवा गिरणी कामगारांचा प्रश्न असो किंवा बॉम्बे ऐवजी मुंबई हे नाव प्रचारात आणण्याचा प्रश्न असो अशा विविध प्रश्नांना महापालिकेच्या माध्यमातून तसेच सार्वजनिक व्यासपीठावरून वाचा फोडली. याच पार्श्वभूमीवर भुजबळांना 1985 साली शिवसेनेने माजगाव विभागातून विधानसभे करता माझी उमेदवारी जाहीर केली होती. तेव्हा शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आले होते.

Chhagan Bhujbal : शिवसेना आणि मशालीचं जुनं नातं, छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हांवर पहिली निवडणूक लढवली होती!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special ReportZero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget