एक्स्प्लोर

नाशिक जिल्हा परिषद राबविणार 'सुपर 50' चा उपक्रम, विद्यार्थ्यांना मिळणार सीईटी, जेईईचे धडे

Nashik News : नाशिक जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद नाशिक कडून 'सुपर 50' उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Nashik Latest Marathi News : नाशिक जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील इयत्ता 11 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद नाशिक कडून 'सुपर 50' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये अनुसूचित जाती / जमाती या प्रवर्गातील सन 2022-23 मध्ये इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांकरीता निवासी स्वरुपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी, जेईई  (CET/JEE) या पात्रता परीक्षेकरीता 50 विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करण्यात येऊन या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातुन यासाठी एक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून यामधील 50 विद्यार्थ्यांची निवड ही 'सुपर 50' उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. यासाठीच्या पूर्व परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. त्याचसोबत विहित नमुन्यात विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाकडे देखील 04 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी अटी...
 सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारा विद्यार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इ. 11 वी विज्ञान शाखेत अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये,आश्रमशाळा, जि. नाशिक येथे प्रवेशीत असावा. सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये किमान 65 टक्के गुण प्राप्त झालेले असावेत.

सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असणारा विद्यार्थ्यास दोन वर्षासाठी प्रशिक्षण व सर्व अध्यापन निवासी शाळेत निशुल्क असेल. त्याकरिता विद्यार्थ्याची व पालकांची तयारी/संमती आवश्यक राहील. सदर योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा अनिवार्य राहील तसेच सदर निवड चाचणी परीक्षेत मेरिट नुसार उच्चतम् गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड मर्यादित स्वरुपात करण्यात येईल.

या उपक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत जिल्ह्यातील 2022-23 या शैक्षणिक वर्षात इ. 11 वी विज्ञान शाखेत अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये,आश्रमशाळा, जि. नाशिक येथे प्रवेशित अनुसूचित जाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, सदर चाचणी परीक्षा मोफत असून  महाविद्यालयांनी या संदर्भात सर्व माहिती विद्यार्थ्यांना द्यावी निर्देश शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी गुगल फॉर्मची लिंक https://forms.gle/p5n5suWvFQSM3iR57

ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने सुपर 50 हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत तज्ञ प्रशिक्षकांकडून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
Embed widget