![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प, संगमनेर महसूल प्रशासनाविरोधात आक्रोश मोर्चा
Nagar News : बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याने संगमेनर येथे आंदोलन करण्यात आले
![बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प, संगमनेर महसूल प्रशासनाविरोधात आक्रोश मोर्चा maharashtra news nashik news Protest march against Sangamner revenue administration बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प, संगमनेर महसूल प्रशासनाविरोधात आक्रोश मोर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/c1c5ca714e78caa34b3849a65455e1001673088356784441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagar News : वाळूचे धोरण नसल्याने वाळूसह खडी मिळणे अवघड झाले आहे. याच कारणामुळे बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या धोरणा विरोधात संगमनेर (sangmaner) शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून वाळू, खडी मिळत नसल्यानं बांधकाम व्यावसाय ठप्प झाले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने गौणखनीज आणि वाळूचे धोरण ठरवावे आणि बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करावी ही मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माजी महसूलमंत्री थोरात यांनी मोर्चाला फोनवरून संबोधीत करताना दहशतीचे राजकरण खपवून घेतले जाणार नाही असा इशारा महसूलमंत्री विखे यांच नाव घेता दिला आहे..
माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विखे यांनी महसूल विभागाची धुरा हातात घेतल्यानंतर महिनाभरापूर्वी संगमनेर तालुक्यातील अनेक दगडखाणींवर अनियमितता असल्याने तब्बल 765 कोटी रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर वाळूचे धोरण नसल्याने वाळूसह खडी मिळणे अवघड झाले आहे. याच कारणामुळे बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. संगमनेर तालुक्यातील बांधकामे ठप्प झाली असून त्यावर काम करणारे मजूर, ठेकेदार, इंजिनिअर यासह अनेक घटक अडचणीत सापडले आहेत. या विरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यात मोठ्या प्रमाणावर महिलाही सहभागी झाल्या होत्या. तर वाळू व खडी मिळत नसल्याने निळवंडे धरणाच्या कालव्यांची सुद्धा कामे बंद असलाचे आंदोलकांनी सांगितलं आहे.
दरम्यान माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही फोनवरून भाषण करत या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आजारी असताना फोनवरून मोर्चाला संबोधित करतानामहसूलमंत्री विखे नाव न घेता यांच्यावर टीका केली आहे. तुमचा आक्रोश तुम्ही मांडताय, मात्र जे कोणी त्रास द्यायला निघाले आहेत. त्यांना सांगितलं पाहिजे, अशा प्रकारचा त्रास सहन केला जाणार नाही.. हे सगळं कठीण असेल, मात्र विजय आपलाच होईल हे लक्षात ठेवा. काही मंडळीच राजकरण हे दहशतीचे असून आतापर्यंत ते असच राजकारण ते करत आले आहेत आणि हीच दहशत जिल्ह्यात करणार असतील तर जिल्हा हे सहन करणार नाही असा इशारा थोरात यांनी दिला आहे. थोरात आणि विखे एका पक्षात असतांना सुद्धा त्यांच राजकीय वैर सुरूच होत.. आज तर दोघेही एकमेकांच्या विरोधी पक्षात असल्याने हा संघर्ष कोणत्या टोकाला जाणार हे आगामी काळाच ठरवेल हे मात्र नक्की..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)