एक्स्प्लोर

Nashik Gangapur Dam : नाशिकच्या गंगापूर धरणात केवळ २७ टक्केच पाणी साठा, पाणी कपात अटळ

Nashik Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात (Nashik) पावसाने पाठ फिरवल्याने धरण साठ्यात (Dam) मोठी घट पाहायला मिळते असून गंगापूर धरणात (Gangapur Dam) केवळ २७ टक्केच पाणी साठा शिल्लक राहिला आहे.

Nashik Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने धरण साठ्यात मोठी घट पाहायला मिळते आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 27 टक्केच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. जून महिना उलटून गेला तरी नाशिककमध्ये पावसाची हवी तशी सुरुवात झाली नाही. अशात लवकर पाऊस झाला नाही तर, नाशिककरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

नाशिक जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाचे आगमन झाले. मात्र अद्यापही अनेक भागात पावसाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील धरणसाठ्यात घट पाहायला मिळत आहे. तर पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्याशिवाय धरणाची पातळी वाढण्यास सुरुवात होत नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांची पातळीही तळाला पोहोचली असून गंगापूर धरण 27 तर गिरणा धरणातील पाणी 33 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीचिंता वाढली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील माणिकपुंज, नागासाक्या, केळझर, भोजापूर, भावली, वाघाड या धरणात शून्य ते पाच टक्यांपर्यंत जलसाठा आहे. तिकडे गंगापूर धरणात 27 टक्के, तर कश्यपीमध्ये 16 टक्के जलसाठा आहे. गौतमी गोदावरी 24 टक्के जलसाठा आहे तर आळंदी प्रकल्पात अवघा दोन टक्के जलसाठा शिल्लक आहे.

तिकडे पालखेड धरण समूहातदेखील पाण्याची वानवा जूनच्या अखेरीत बघायला मिळत असून पालखेड धरण सोडले तर करंजवन आणि वाघाडने तळ गाठलेले आहे. करंजवनमध्ये 11 टक्के जलसाठा सद्यस्थितीत आहे. तर वाघाडमध्ये पाच टक्के जलसाठा आहे. ओझरखेड, पुणेगाव आणि तिसगाव या तीनही धरणांत अनुक्रमे, 26 टक्के, 11 टक्के आणि शून्य टक्के असा जलसाठा आहे. दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा आणि नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांत मुकणे धरण वगळता इतर धरणांत जलसाठा खालावला आहे. यात दारणा धरणात 14 टक्के, भावलीत 08, वालदेवी दहा तर कडवामध्ये 13 टक्के जलसाठा आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात 82 टक्के जलसाठा आहे.

तसेच गिरणा खोरे धरण समूहातील चणकापूर, हरणबारी केळझर नागसाक्या व गिरणा धरणातदेखील जलसाठा कमी झाला आहे. चणकापूरमध्ये 20 टक्के, हरणबारीत 27, केळझरमध्ये सहा टक्के तर नागसाक्या कोरडेठाक पडले आहे. मालेगाव, नांदगावसह उत्त्तर महाराष्ट्राची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात 33 टक्के जलसाठा असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर मध्यम प्रकल्प असलेल्या पुनद धरणात 21 टक्के जलसाठा आहे. तर माणिकपुंज कोरडेठाक पडले असून मनमाडवासियांचा पाणीप्रश्न अतिबिकट होण्याची शक्यता आहे.

गंगापूर धरणात केवळ 27 टक्के पाणी 
शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 27 टक्के पाणी शिल्लक राहिल्याने नाशिकसमोर पाणीप्रश्न उभा ठाकलाय. पावसाळा सुरू झाला अद्यापही नाशिक जिल्हा दमदार  पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. फक्त गंगापूर धरणच नव्हे तर जिल्ह्यातील संपूर्ण धरणसाठ्यांमध्ये देखील दिवसेंदिवस घट होतेय. अशात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिंता नागरिकांना वाटू लागली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget