(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज येवला, नांदगाव दौऱ्यावर; भुजबळ, कांदेंविरोधात उमेदवारांची शोधाशोध, जाहीर सभाही घेणार
Aaditya Thackeray : आज आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ते आज येवला आणि नांदगाव मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तसेच दोन्ही मतदारसंघात जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बुधवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ते आज येवला (Yeola) आणि नांदगाव (Nandgaon) मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तसेच दोन्ही मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकसून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. आदित्य ठाकरे यांचा आज नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे हे छगन भुजबळ यांच्या येवला आणि सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. एकेकाळी शिवसेनेत असणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या विरोधात आदित्य ठाकरे उमेदवारांची चाचपणी करणार आहे. नांदगाव आणि येवला मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे कोणाला बळ देणार? याकडे लक्ष
येवला आणि नांदगाव या दोन्ही मतदारसंघात आदित्य ठाकरे कोणाला बळ देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची होणार जाहीर सभा होणार आहे. छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे काय बोलणार? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, बुधवारी नाशिकमधील सभेतून बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. घटनाबाह्य खोके आणि मिंधे सरकार हटविण्याची वाट जनता बघत आहे. मात्र, मिंध्यांना निवडणुकीची भीती वाटत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या महापालिकेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाही. नगरसेवक, लोकप्रतिनिधी नसल्याने महापालिकेच्या कामांचा बट्टाबोळ झाला आहे. प्रशासकांच्या माध्यमातून शहरांची लूट सुरू आहे. मात्र, आपले सरकार आल्यानंतर भ्रष्ट अधिकारी आणि लूट करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच आहोत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच यांना आता लाडकी बहीण आठवली. मी सांगतो लाडकी बहीण आम्ही बंद करणार नाही तर त्यात वाढ करून राज्यातील महिलांसाठी शक्ती कायदा करणार, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
आणखी वाचा