एक्स्प्लोर
राज्यातील तूर खरेदी केंद्र बंदच, 24 तासानंतरही आदेश नाही
उस्मानाबाद : ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केली आहे, त्यांची तूर खरेदी केली जाईल, असा निर्णय सरकारने काल घेतला. मात्र 24 तास उलटूनही अद्याप आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील सरकारी तूर खरेदी केंद्र बंदच आहेत.
शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. सरकारी केंद्रांवर तूर खरेदीची 22 एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्यामुळे त्यानंतर तूर खरेदी थांबवण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत किंवा त्यापूर्वी नोंदणी केली होती, त्याची तूर खरेदी केली जाईल, असा निर्णय सरकारने काल घेतला होता.
सरकारच्या या निर्णयाला 24 तासांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला आहे. वैतागून काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने तूर खरेदी केली आहे. सरकारकडून 5 हजार 50 रुपये हमीभावाने तूर खरेदी केली जाते. तर व्यापाऱ्यांकडून 4 हजार रुपये भाव देण्यात आला आहे.
तूर खरेदीला आणि पैसे मिळायला दोन महिने उलटणार?
फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तूर खरेदीची सरकारने घोषणा केली खरी, पण 22 एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करायचं ठरलं तरी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.
कारण नाफेडने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली तरी, नोंदणी झालेली तूर खरेदी करण्यासाठी महिना उलटण्याची शक्यता आहे. तूर खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडायला किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतरही तूर खोळंबा कायम राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!
सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय
काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च
तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना
नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement