Dasara Teaser : 'दसरा' चा टीझर पाहून एस.एस राजामौली झाले इम्प्रेस; ट्वीट शेअर करुन अभिनेता नानीचं केलं कौतुक
'दसरा' (Dasara) या चित्रपटाच्या टीझरचं प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी कौतुक केलं आहे.
Dasara Teaser : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नानी (Nani) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. नानीचा 'दसरा' (Dasara) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची नानीचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षरकांच्या भेटीस आला. या टीझरमधील नानीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटाच्या टीझरचं प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी कौतुक केलं आहे.
'दसरा' (Dasara) हा पॅन इंडिया चित्रपट आहे. या चित्रपटात वीरलापल्ली या गावातील तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे. दशहराच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. हा टीझर पाहिल्यानंतर एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) इम्प्रेस झाले. एस. एस. राजामौली यांनी ट्वीट शेअर करुन 'दसरा' चित्रपटाच्या टीझरचं कौतुक केलं आहे.
एस.एस राजामौली यांचे ट्वीट
'दसरा' चित्रपटाच्या टीझरमधील व्हिजुअल्स अप्रतिम आहेत. यामधील अभिनेता नानीचा मेकओवर इम्प्रेसिव्ह आहे. एक डेब्यू डायरेक्टर एवढं अप्रतिम काम करत आहे, हे पाहून आनंद झाला. चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा.'
Loved the visuals of #Dasara's teaser. @NameisNani's massy makeover is impressive… Very good to see a debutant director create such an impact. The last shot is THOPE. All the best @odela_srikanth and the entire team..:) https://t.co/uuswovsvzH
— rajamouli ss (@ssrajamouli) January 30, 2023
'दसरा' चित्रपटाचं दिग्ददर्शन श्रीकांत ओडेला यांनी केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून श्रीकांत यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात साई कुमार, समथिरकानी, दीक्षित शेट्टी, संतोष नारायणन आणि जरीना वहाब हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 30 मार्च रोजी रिलीज होणार आहे. दसरामध्ये नानीनं हटके हेअरस्टाइल, शर्ट आणि लुंगी असा लूक केलेला दिसत आहे. त्याच्या लूकची तुलना अनेक जण पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या लूकसोबत करत आहेत.
'दसरा' चित्रपटाचा पोस्टर नानीनं सोशल मीडियावर शेअर केला होता.
View this post on Instagram
पाहा दशहराचा टीझर:
महत्वाच्या इतर बातम्या: