February 2023 Movie Release: फेब्रुवारी महिन्यात होणार मनोरंजनाचा धमाका; मोठ्या पडद्यावर रिलीज होणार 'हे' चित्रपट
फेब्रुवारी (February 2023) महिन्यामध्ये काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. फेब्रुवारी 2023 रोजी कोण-कोणते चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहेत. ते जाणून घेऊयात...
February 2023 Movie Release in Theatre: वर्षाची सुरुवात पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटानं झाली. पठाण चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. आता पठाण चित्रपटाच्या कलेक्शनचं रेकॉर्ड मोडण्याचं मोठं आव्हान वर्षभरात रिलीज होणाऱ्या चित्रपटांसमोर आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. फेब्रुवारी 2023 रोजी कोण-कोणते चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहेत, ते जाणून घेऊयात...
फराज (Faraaz)
फराज हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून अनेक कलाकारांनी बॉलिवूजमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केलं आहे. तर अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये रिलीज करण्यात आलं होतं. हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत (Almost Pyaar with DJ Mohabbat)
ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत हा अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केलेला चित्रपट 3 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल हा डीजेची भूमिका साकारणार आहे.
शहजादा (Shehzada)
अभिनेता कार्तिक आर्यनच्या शहजादा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रोहित धवननं शहजादा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच क्रिती सेनन देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
टायटॅनिक 3D (Titanic 3D)
टायटॅनिक चित्रपट रिलीज होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं टायटॅनिक 4K 3D हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 10 फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
शिव शास्त्री बलबोओ (Shiv Shastri Balboa)
अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांचा शिव शास्त्री बलबोओ हा चित्रपट 10 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून अनेकजण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
शाकुंतलम (Shaakuntalam)
समंथा रुथ प्रभूचा शाकुंतलम हा चित्रपट कालिदास यांच्या ‘कालिदास शाकुंतलम’ या महाकाव्यावर आधारित आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
सेल्फी (Selfiee)
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेता इमरान हाश्मी यांचा 'सेल्फी' हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.
महत्वाच्या इतर बातम्या: