Nandurbar Accident: मोठी बातमी : ऐन दिवाळीत भाविकांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, महाराष्ट्र सुन्न
Nandurbar Road Accident: नंदूरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात झाला. अपघातस्थळावरचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Nandurbar Road Accident: नंदूरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात शनिवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील चांदशैली घाटात (chandshail ghat) पिकअप गाडी उलटून हा अपघात झाला. या गाडीतील लोक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातला. चांदशैली घाटातून पिकअप गाडी जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. (Road Accident)
प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या या सर्वांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले.
पिकअप व्हॅन घाटात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. त्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले. अनेकांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस बचाकार्यासाठी घटनास्थळी आले तेव्हा येथील दृश्य भयावह होते. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. यापैकी अनेकजण गंभीर जखमी दिसत होते. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात; म्यानमारच्या 2 जणांचा जागीच मृत्यू
वाशिम: समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात म्यानमारच्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या वाशिमच्या मालेगाव ते जऊळका दरम्यान कॉरिडरवर क्रमांक 232 वर हा अपघात झाला आहे. इनोव्हा गाडीच्या वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा
विमानतळावर भीषण अपघात; दोन विमानांची जोरदार धडक, एकाचं नाक तर दुसऱ्याचं पंख तुटलं!
























