एक्स्प्लोर

Nandurbar News: तीन कोटी रुपये खर्च करून बांधलेला जलशुद्धीकरण प्रकल्प धूळ खात पडून, तळोदावासियांना शुद्ध पेयजलाची प्रतीक्षा

Nandurbar News: राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि  राजकारणाची पोळी भाजण्यासाठी केली जाणारी विकास कामे यामुळे या प्रकल्पाची दूरवस्था झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे

 नंदुरबार :  एक दोन नव्हे तर तब्बल तीन कोटी खर्च करुन बांधण्यात आलेले तळोदा नगरपालिकेचा जल शुद्धीकरण केंद्र तब्बल सहा वर्षांपासून धूळ  खात पडून आहे. राजकीय अनास्थेच्या कचाट्यात सापडलेल्या या जलशुद्धीकरण केंद्राची अतिशय दूरवस्था झाली असून कोट्यावधींची उधळण करुन देखील तळोदावासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. बोअरिंगच्या पाण्याने संपूर्ण शहराची तहान भागवावी लागत आहे. 

तब्बल तीन कोटी रुपये खर्च

खानदेशातील सर्वात जुनी नगरपालिका म्हणून तळोदा शहराची ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात निर्मिती झालेली तळोदा नगरपालिका स्वातंत्र्यांनंतरही इथल्या शहरवासीयांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. तळोदा पालिकेने बांधलेले जलशुद्धीकरण केंद्र , कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंजूर झालेला तळोदा पालिकेचा जलशुद्धीकरण केंद्राचा महत्वाकांशी प्रकल्प 2017 मध्ये पुर्णत्वास आला. तब्बल तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या जलशुद्धीकरण केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात आली.  सोबत शहराला  शुद्ध पाणी पुरवण्यासाठी पाईपलाईन देखील टाकण्यात आल्या. मात्र आज जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण झाले असून सहा वर्षाहून अधिकचा काळ लोटत आला तरी यात कणभर देखील पाणी शुद्ध झाले नाही. धूळ खात पडलेल्या या जलशुद्धीकरण केंद्राची दुर्दशा झाली आहे. फक्त तळोद्यातील राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि  राजकारणाची पोळी भाजण्यासाठी केली जाणारी विकास कामे यामुळे या प्रकल्पाची दूरवस्था झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

कुपनलिकेच्या पाण्यामुळे पोटाचे आजार

विशेष म्हणजे गेली सहा वर्षे पालिकेत भाजपाची सत्ता होती. मात्र त्यांची सत्ता असून देखील गुजरातच्या भाजपा सरकारने तापी नदीपात्रीतून पाणी उचलण्यास परवानगी नाकारल्यानेच या जलशुद्धीकरण केंद्रात पाणीच आले नाही. अशातच आता पुन्हा तळोदा शहर पाणी पुरवठासाठी 28 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता या प्रकल्पाचा किती वापर होईल आणि याच्या दुरुस्तीसाठी किती निधी लागेल याबाबत मात्र साशंकताच व्यक्त होत आहे. आज तळोदा शहरातील नागरिकांच्या पाण्याची तहान शहरातील साठहून अधिक कुपनलिकेद्वारे भागवली जात आहे. शहरात जागोजागी केलेल्या कुपनलिकेतून तळोदावासियांना कसेबसे पाणी तर मिळते मात्र या कुपनलिकेच्या पाण्याने लहान मुलांसह ज्येष्ठांनादेखील पोटाच्या आजारांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

पैसे मोजून नागरिक पिण्याचे पाणी विकत घेत असताना पालिकेकडून मात्र पाणीपट्टीची वसूली

याबाबत तळोदा पालिकेच्या प्रशासकांसोबत बोलण्यासाठी तीनदा गेले असता एकदाही येथे कोणीही अधिकारी मिळालाच नाही आणि जे मिळाले ते माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. कोट्यावधी रुपये पाण्यात जाण्याचा प्रकार म्हणजे तळोद्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. एकीकडे तळोदावासीय खाजगी व्यापाऱ्यांकडून पैसे मोजून पिण्याचे पाणी विकत घेत असताना दुसरीकडे पालिका मात्र पाणीपट्टीची वसूली करतच आहे. मग अशा कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या योजन अशाच पडून राहणार असेल तर हर घर नल योजना कशी यशस्वी होणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.

हे ही वाचा :

Nandurbar Pregnant Woman Scary Incident :आदिवासी भागात सुविधांची वाणवा, गरोदर महिलेचा जीवघेणा प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget