(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बनावट कागदपत्रे अन् खोट्या स्टॅप्मचा वापर, नंदुरबारमध्ये तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Nandurbar : महसूल आणि इतर शासकीय कार्यालयातील बनावट दस्तावेज तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
Nandurbar Latest News Update : बनावट सरकारी कागदपत्रे आणि खोट्या शिक्क्यांचा वापर करणाऱ्या टोळींचा नंदुरबार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात महसूल, राज्य परिवहन महामंडळ व इतर शासकीय कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सवलती याच्या करिता लागणारी बनावट कागदपत्रे तयार करीत संबंधित विभागाचे खेटे रबरी शिक्के मारत शासनाची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना शहादा पोलिसांनी अटक केलेली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात खोटे स्टॅम्प वापरून शासकीय कागदपत्राची हेराफेरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बेकायदेशीर खोटे रबरी स्टॅम्प वापरणारी टोळी उघडकीस आल्याने प्रशासकीय कार्यालयात एकच खळबळ माजली आहे. याबाबत शहादा पोलीस स्टेशनला मृनिका स्वप्निल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून आरोपींना चार दिवस पोलीस कस्टडी सुनवण्यात आलेली आहे.
शहादा शहरामध्ये शासनाचे खोटे रबरी स्टॅम्प बनवून शासनाच्या विविध सवलती मिळवण्यासाठी आरोपींनी शासनाची दिशाभूल केलेली आहे. शहादा शहर व तालुक्यात तहसील कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, पंचायत समितीकडून अंध- अपंग कर्णबधिर या लोकांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन महामंडळाच्या सवलती पासेस देण्यासाठी कागदपत्राची पूर्तता करावी लागत असते. विविध सवलतीसाठी कागदपत्रची पूर्तता करून त्यांना सवलत मिळत असते, त्यासाठी त्या संबंधित विभागाच्या कार्यालयात संबंधित कार्यालयाच्या रबरी शिक्याच्या स्टॅम्पचा वापर होत असतो. शहादा शहरात बेकायदेशीर रबरी स्टॅम्प शिक्याच्या वापर करून शासकीय योजनांच्या फायदा मिळवून देण्यासाठी ही टोळी गेल्या अनेक महिन्यापासून कार्यरत होती. या टोळीने राज्य परिवहन महामंडळ शहादा महसूल विभाग अंध, अपंग, मूकबधीर कर्णबधीर यांची फसवणूक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून रॉयल्टीसाठी वापरलेल्या जाणाऱ्या पुस्तकांवर बेकायदेशीर रबरी स्टॅम व संबंधित अधिकाऱ्याची खोटी सही करून त्याच्या सर्रास वापर करून लाखो रुपये कमवण्याच्या प्रकार सुरू होता.
या संदर्भात स्वप्निल पाटील यांनी शहादा पोलिसात गुन्हा दाखल केला. शासनाचे खोटे रबरी स्टॅम्प म्हणून लोकांची दिशाभूल व शासनाच्या दिशाभूल करणाऱ्या संदीप उर्फ संतोष गोरख पान पाटील महेंद्र सिताराम वाघ व सुनील चौधरी अशा तीन आरोपी पोलीस प्रशासनाने अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना चार दिवस पोलीस कस्टडी सोनवण्यात आलेली आहे. शासनाचे खोटे रबरी स्टॅम्प म्हणून अंध, अपंग कर्णबधिर अशांची दिशाभूल करीत तसेच राज्य परिवहन महामंडळ महसूल विभाग व इतर शासकीय कार्यालयात मिळणाऱ्या सवलतीच्य योजनांसाठी लागणारा कागदपत्रांवर खोटे रबरी स्टॅम्प मारून दिशाभूल करणाऱ्या या टोळीच्या पर्दाफाश झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ माजलेली आहे.