Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू
Nanded Poison Case : नातेवाईकांच्या शेतातून आणलेल्या सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
नांदेड : नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडलीय. त्यामध्ये उपचारादरम्यान 12 वर्षीय मुलीचा मृत्यु झाला. सोयाबीनच्या शेंगा खाल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. मिरा खानजोडे असं मयत मुलीचं नाव आहे.
सिडको येथील रहिवासी बबन खानजोडे यांनी तीन दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या. काही शेंगा भावाच्या कुटुंबीयाना दिल्या. गुरुवारी रात्री सर्वांनी सोयाबीनच्या शेंगा खाल्या. मात्र काही तासानंतर एकापाठोपाठ एकाला मळमळ आणि उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर सर्वांना नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय दखल करण्यात आले होते.
उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नऊ जणांपैकी दोघांची प्रकृती अत्याव्यस्थ होती. रविवारी मीरा खानजोडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे तपासणी अहवाल आल्यानंतर कळेल.