Success Story : इंजिनिअर दामपत्य रमले शेवग्याच्या शेतीत; शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती, कमी खर्चात लाखो रुपयांचं उत्पन्न
Nanded News: शेवग्याच्या शेंगांचा त्यांनी व्यवसाय सुरु केला होता. मात्र म्हणावं तसा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली.
Success Story : अलिकडच्या काळात काही तरुण शेतकरी (Farmers) शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. तर काही उच्चशिक्षीत तरुण नोकरी न करता शेती करताना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यातील उच्च शिक्षित आणि आयटी इंजिनियर असलेल्या एका दाम्पत्याने लाखो रुपयांची नोकरी सोडून शेवग्याच्या (Drumstick) पाल्यापासून नवीन आणि वेगळा व्यवसाय सुरु केला आहे. यामधून दाम्पात्य लाखो रुपये कमावतोय. मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे असं या शेतकरी दाम्पत्याच नाव आहे
नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी येथील रहिवासी मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे आयटी क्षेत्रातील इंजिनियर आहेत. पुणे आणि हैदराबाद सारख्या मेट्रो शहरात त्यांनी मागील 15 वर्ष मोठ्या कंपनीत नोकरी केली. मंजुषा पावडे यांना महिन्याला 1 लाख 20 हजार तर त्यांचे पती गुलाब पावडे यांना जवळपास दोन लाख रुपये इतकं पॅकेज मिळत होते. मात्र शेतीच्या माध्यमातून वेगळं काही व्यवसाय सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न होतं.
हैदराबाद येथे वास्तव्यास असताना त्यांनी शेवग्याच्या शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. शेवग्याच्या शेंगा आणि पाल्याचे काय गुणधर्म आहे. लागवड कशी करावी त्यातून उत्पन्न किती मिळेल याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. 2018 साली हे दाम्पत्य नोकरी सोडून आपल्या गावी परतले. स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये कुठलंच पीक न घेता शेतात शेवग्याची लागवड केली. दोन ओळीत नऊ फूट अंतरावर शेवग्याची रोपे लावली. सुरुवातीला शेवग्याच्या शेंगांचा त्यांनी व्यवसाय सुरु केला होता. मात्र म्हणावं तसा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली.
शेवग्याच्या पालापासून पावडर मोरिंग्या पावडर म्हणून ओळखल्या जातं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पावडर अत्यंत गुणकारी आणि रामबाण असल्याच म्हटलं जातं. एक हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होतं असून पावडे दाम्पत्यांना महिन्याकाठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारा हा व्यवसाय मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे यशस्वीरित्या सांभाळत आहेत. या पावडरला पुणे ,मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मोठी मागणी असून डॉक्टर आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात पावडर खरेदी करत असल्याची माहिती पावडे दाम्पत्यांनी दिली.
हे ही वाचा :