Nanded Hospital Death : नवजात बालकासह आईचाही मृत्यू, रुग्णालयात एकच आक्रोश; नांदेडमधील मृत्यूचे तांडव सुरूच
Nanded Hospital Death : सर्व काही व्यवस्थित असतानाच शनिवारीच तुमचं बाळाचा मृत्यू झाला असं म्हणत बाळाला घेऊन जाण्याचे डॉक्टर म्हणाले.
Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) मृत्यूचे तांडव सुरूच असून, एका मातेसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या (Nanded) याच शासकीय रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती (Delivery) होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि आज तिचा सुद्धा मृत्यू झाला. शनिवारपासून या महिलेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी उपाचाराबाबत काही माहिती दिली नसल्याचा आरोप होत आहे.
शनिवारी संध्याकळी अंजली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रात्री एक ते दीडच्या सुमारास त्यांची सामान्य प्रस्तुती झाली. मुलगी झाली असून, बाळ व बाळाची आई सुखरूप असल्याचे माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. दोन-तीन दिवसांत सुट्टी होईल या अपेक्षेने महिलेचे नातेवाईक रुग्णालयात थांबले होते. दरम्यान, सर्व काही व्यवस्थित असतानाच शनिवारीच तुमच्या बाळाचा मृत्यू झाला असं म्हणत बाळाला घेऊन जाण्याचे डॉक्टर म्हणाले. विशेष म्हणजे या काळात बाळाला व बाळाच्या आईला लागणारी औषधी डॉक्टर लिहून देत होते आणि आम्ही ते बाहेरून आणत होतो. औषधाचा खर्च पन्नास हजाराच्या जवळपास झाला.पण एवढे करूनही आम्हाला अचानक बाळ दगावल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आम्हाला धक्काच बसला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नी व मुलगी गेल्याने अत्यंत दुखी झाल्याची प्रतिक्रिया महिलेचां पत्ती मंचक वाघमारे यांनी दिली आहे.
रुग्णालयात एकच आक्रोश
शासकीय रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून औषधी आणावे लागतात. मयत अंजली वाघमारे यांच्या कुटुंबातील सदस्यांना याचा खर्च चाळीस हजाराहून अधिक आला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले परिवारास हा खर्च न परवडणारा आहे. त्यातच मुलगी गेली व पत्नीही गेल्याने पतीने हंबरडा फोडत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या सर्व घटनेत सरकार जबाबदार असल्याचे प्रतिक्रिया परिवारातील सदस्यांनी दिली. यावळी रुग्णालयात एकच आक्रोश पाहायला मिळाले.
वडेट्टीवारांसमोरच टाहो फोडला
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी वाघमारे कुटुंबाने आपली मुलगी आणि तिचे नवजात बाळ गमावले सांगत वडेट्टीवारांसमोरच टाहो फोडला. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. खूप चीड येत आहे सत्तेत बसलेल्या निष्ठुर सत्ताधाऱ्यांची. थोडी तरी माणुसकी शिल्लक असेल तर सत्तेची मलाई खाणाऱ्यानी डोळे उघडावे, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: