Nanded News: अधिकचा परतावा अन् महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष; नांदेडात शेअर मार्केट गुंतवणूक घोटाळा
Nanded News: शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने झालेल्या फसवणूक प्रकरणात नांदेडच्या वजिराबाद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Nanded News: अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादमध्ये झालेला तीस-तीस घोटाळा, सोलापूर येथील शेअर मार्केट गुंतवणूक घोटाळा आणि जालना येथे क्रिप्टो करन्सी कॉइनच्या नावाने झालेला घोटाळा ताजा असतानाच आता नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा, विदेशवारी आणि महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष दाखवून मुख्याध्यापकासह सात जणांना सव्वा कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात नांदेडच्या वजिराबाद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसात दाखल करण्यात गुन्ह्यानुसार, नांदेड शहरातील जुना कौठा भागातील श्रीपादनगरचे मुख्याध्यापक आनंद नागनाथराव रेणगुंटवार हे पंढरपूर येथे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. दरम्यान तेथे त्यांची कॅपिटल सिकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एलएलबी कंपनीचे मुख्य संचालक रोहितसिंह धर्मासिंह सुभेदार (रा. दत्तनगर), सांगली यांच्याशी भेट झाली. पुढे या भेटीचे रूपांतर चांगल्या मैत्रीत झाले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा, विदेशवारी आणि महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष दाखवून रोहितसिंह धर्मासिंह सुभेदार आणि त्याच्या साथीदाराने रेणगुंटवार यांच्यासह आणखी सहा जणांना गुंतवणूक करण्याचे सांगत त्यांच्याकडून 1 कोटी 14 लाख रुपये घेतले.
अशी केली फसवणूक!
मोठमोठी आमिष दाखवल्यानंतर रेणगुंटवार यांच्यासह आणखी सहा जणांचा रोहितसिंह धर्मासिंह सुभेदार याने आधी विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने सात जणांकडून गोळा केलेले 1 कोटी 14 लाख रुपये 2021 मध्ये वजिराबाद येथील एसबीआय बँक आणि कलामंदिरच्या अॅक्सीस बँकेतून पाठविले होते. पुढे विदेशवारी, महागड्या गाड्या भेट देण्याचे आश्वासनही दिले. तसेच करारपत्र करून गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित असल्याचा भास निर्माण केला. विशेष म्हणजे सुरुवातीचे काही महिने आकर्षक परतावाही दिला. परंतु त्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे रेणगुंटवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रोहितसिंग धर्मासिंग, डॉ. बाबूराव हजारे (रा. कोल्हापूर), शिवाजी गणपत हजारे (रा. कोल्हापूर), बाबासो गोपाल धनगर आणि इंद्रजित भारत म्हाळुंगे (रा. गडहिंग्लज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महिने आकर्षक परतावाही दिला!
यातील आरोपींनी लोकांना फसविण्यासाठी कॅपिटल सिकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड एलएलबी नावाची कंपनी उघडली होती. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी या कंपनीचे वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार ठेवण्यात आले. गुंतवणुकीच्या मोबदल्यात आमिषे दाखविली गेली. विदेशवारी, महागड्या गाड्या भेट देण्याचे आश्वासन दिले गेले. यासोबतच करारपत्र करून गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित असल्याचा भास निर्माण केला. तसेच सुरुवातीचे काही महिने आकर्षक परतावाही दिला. परंतु त्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने आरोपींचा भांडाफोड झाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nanded: नांदेड महापालिकेत ईडीची एन्ट्री झाल्याने अधिकाऱ्यांचा मुंबईकडे पळ, अधिकारी कार्यालयातून गायब