नांदेडमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू, 3 वर्षाच्या चिमुकली बचावली
बस आणि दुचाकीच्या अपघातात झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचालक आणि 3 वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली आहे.

Nanded Accident : बस आणि दुचाकीच्या अपघातात झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचालक आणि 3 वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात आज दुपारी 12 च्या सुमारास हा अपघात घडला आहे.
उदगीरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस आणि दुचाकीची हानेगाव जवळील औराद वझर कॉर्नरवर समोरासमोर धडक झाली. दुचाकीवर तीन जणांसोबत एक तीन वर्षाची चिमुकली होती. दुचाकी थेट एस टी बसखाली अडकल्याने दुचाकीवरील चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमीना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान 70 आणि 75 वर्षीय दोन वृद्धाचा मृत्यू झाला. दुचाकीचालक आणि तीन वर्षाची चिमुकली बचावली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























