Nanded News: ...अन्यथा नांदेडात होणारा श्री श्री रविशंकर यांचा कार्यक्रम उधळून लावू; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा
Nanded News: श्री श्री रविशंकर यांनी शिवरायांची जाहीरपणे माफी मागावी याबाबत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने शहरभर बॅनरही लावले होते.
Nanded News: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची बदनामी करणाऱ्या आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी शिवरायांची जाहीरपणे माफी मागावी अन्यथा नांदेडात होणारा त्यांचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने (Swabhimani Sambhaji Brigade) दिला आहे. तर श्री श्री रविशंकर यांनी शिवरायांची जाहीरपणे माफी मागावी याबाबत शहरभर बॅनरही लावले होते. परंतु पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर यांचा महासत्संगाचा कार्यक्रम 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नांदेड शहरातील कौठा परिसरात आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, श्रीश्री रविशंकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरलेला एक व्हिडीओ पोस्ट केला असल्याचा आरोप केला जात आहे. तर याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे श्री श्री रविशंकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर यांनी केली आहे.
अन्यथा कार्यक्रम उधळून लावू...
श्री श्री रविशंकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे रविशंकर यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच असे न झाल्यास, 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नांदेड शहरातील कौठा परिसरात रविशंकर यांचा आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
शहरभर बॅनरही लावले...
नांदेड शहरातील कौठा परिसरात 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी रविशंकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, याचे शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. दरम्यान याच वेळीस रविशंकर यांनी माफी मागावी अशा आशयाचे बॅनर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून देखील शहरभरात लावण्यात आले होते. ज्यावर 'जाहीर निषेध' असा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी प्रकरणी श्री श्री रविशंकर यांनी माफी मागावी, अन्यथा नांदेड येथील कार्यक्रमास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तीव्र विरोध करणार, असा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबत बॅनरवर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड निवदेन देखील पाहायला मिळत आहे. मात्र पोलिसांनी हे सर्व बॅनर काढून घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: