Nirankari Sant Samagam: रोज 50 हजार लिटर दुध अन् 72 क्विंटलचं भात; औरंगाबादमध्ये भव्यदिव्य समागम सोहळा
Satsang Programme In Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज या सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे
Satsang Programme In Aurangabad: महाराष्ट्राचा 56 वा प्रांतीय निरंकारी संत समागम सोहळ्याचे (Maharashtra Nirankari Sant Samagam) आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये करण्यात आला आहे. औरंगाबादेत पहिल्यांदाच 27 ते 29 जानेवारीदरम्यान हा आध्यात्मिक सोहळा पार पडत असून, यासाठी सुमारे तीन लाख भाविक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर बिडकीन डीएमआयसीतील 300 एकर जागा त्यासाठी घेण्यात आली असून, मुख्य सभामंडप तब्बल तीन लाख चौरस फुटांचा उभारला आहे. विशेष म्हणजे या भव्यदिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह देशभरातील आणि विदेशातील भक्त उपस्थित आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज या सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे
या सोहळ्यासाठी डिसेंबर महिन्यापासून तयारी सुरू असून, 15 हजार स्वयंसेवक दिवसरात्र राबत होते. तर 57 फूट उंच व 75 फूट रुंद असे भव्य स्वागतद्वार उभारण्यात आहे. यावर औरंगाबादेतील प्राचीन वारसा बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तीन लाख भाविकांच्या राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात राज्यानुसार मंडप तयार केले आहेत. दरम्यान यावेळी संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे मार्गदर्शन भाविकांना लाभत आहे.
असा असेल भव्य सोहळा!
- 72 क्विंटल तांदूळ एकाचवेळी शिजवणार
- हजारो जुडी भाज्या वेगवेगळ्या राज्याततून मागवल्या जाणार
- 7 हजार महिला पुरुष करणार स्वयंपाक
- दीड लाख भाविकांच्या एकाच वेळी जेवणाची व्यवस्था
- 50 हजार लिटर दूध रोज लागणार
- 25 नळाच्या तोटीतून मिळणार 24 तास चहा
- जेवणाच्या भट्टीसाठी 30 हजार लिटर डिझेल लागणार
- 25 मोठ्या एलईडी आणि 500 स्पीकरची व्यवस्था
- 25 पोस्ट फायर आणि 200 अग्निशमन सिलिंडर
वाहतुकीत बदल...
या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीत मोठा बदल केला आहे. औरंगाबादवरून पैठणला जाणाऱ्या जड वाहनधारकांसाठी बिडकीनपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तर यासाठी औरंगाबादवरून वाळुजमार्गे या वाहनधारकांना पैठणला जावे लागणार आहे. त्यामुळे आता पैठणला जाणाऱ्या जड वाहनधारकांना मोठा फेरा मारावा लागणार आहे.
बदल करण्यात आलेला जड वाहतुक मार्ग
- सोलापुर धुळे NH-52 महामार्ग बीड मार्गे येणारी जड वाहतूक ही NH-52 महामार्गने सरळ पुढे ए.एस. क्लब मार्गे औरंगाबाद ते अहमदनगर हायवेने अहमदनगर कडे जाईल. तसेच याप्रमाणे व उलट दिशेने वाहणे ये-जा करतील.
- औरंगाबादवरुन पैठणला जाणाऱ्या जड वाहनधारकांनी औरंगाबाद, वाळुज, पैठणखेडा, रांजनगाव खुरी, शेकटा , ब्राम्हणव्हाण, लोहगाव , जळगाव, लोहगाव फाटा, ढोरकीनहुन पैठणला जावे. याप्रमाणे व उलट दिशेने वाहने ये-जा करतील. किंवा औरंगाबाद, पाचोड,पैठण याप्रमाणे व उलट दिशेने वाहने ये-जा करतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर; असा असणार संपूर्ण दौरा