Laxman Hake: ब्राह्मणांनी शिक्षणाच्या जोरावर प्रगती केली, त्यांनी मागासलेल्यांना हक्क मिळवून दिले, ते ओबीसींचे शत्रू नाहीत: लक्ष्मण हाके
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांची सभा हदगाव येथे पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना ओबीसीचा शत्रू हा ब्राम्हण नाही. ब्राह्मण आपले उच्च शिक्षणाच्या जोरावर जगाच्या प्रगत देशांमध्ये गेलेला आहे, असं म्हणत ओबीसीचा शत्रू कोण याबाबत भाष्य केलं आहे.
नांदेड: एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लक्ष्मण हाके देखील आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. काही करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देवू नये अशी त्यांची मागणी आहे. शिवाय जरांगेंची सगेसोयरेची मागणी मान्य करू नये. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येवू नयेत अशीही त्यांची मागणी आहे. अशातच होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांबाबत बोलताना ओबीसीचा शत्रू हा ब्राह्मण नाही, असं लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची सभा हदगाव येथे पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना ओबीसीचा शत्रू हा ब्राम्हण नाही. ब्राह्मण आपले उच्च शिक्षणाच्या जोरावर जगाच्या प्रगत देशांमध्ये गेलेला आहे. तो आपल्या हक्कासाठी भांडत बसला नाही तर तो इतरांना आपला हक्क देणारा ब्राह्मणच होता. पण, आजचा जो महाराष्ट्र आहे तो फक्त काही ठराविक लोकांचा वतनदारांचा आणि दरोडेखोरांचा महाराष्ट्र पहायला मिळत आहे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
ओबीसीचा खरा शत्रू ब्राम्हण नाही.ओबीसीचा खरा शत्रू महाराष्ट्र लाटणारा आमदार, खासदार, वतनदार, दरोडेखोर,यांची टोळी आहे. ब्राम्हण हा आज शिक्षणाच्या जोरावर प्रत्येक प्रगत देशामध्ये गेला. तो इथे भांडत बसला नाही. जो मागासलेला होता, त्याला त्याचा हक्क मिळवून देणारा हा ब्राम्हणच होता. पण, आजचा जो महाराष्ट्र बघायला मिळतोय, फक्त काही ठराविक लोकांचा वतनदारांचा आणि दरोडेखोरांचा महाराष्ट्र पहायला मिळत आहे, असं लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी म्हटलं आहे.