एक्स्प्लोर

Chandrayan 3 : शाब्बास पोरी नाव काढलसं! चांद्रयान मोहिमेत नांदेडच्या तनुजा पत्की यांचा सहभाग

Chandrayan 3 : चांद्रयान मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येक शास्त्रज्ञांचा आज भारताला अभिमान आहे. पण या शास्रज्ञांच्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा देखील समावेश आहे.

नांदेड : भारताच्या चांद्रयानाने (Chandrayan) चंद्रावर पाऊल ठेवलं आणि इतिहास रचला. या मोहिमेसाठी अनेक जणांनी रात्रीचा दिवस एक करुन आपली संपूर्ण मेहनत पणाला लावली होती. यामधील प्रत्येक शास्रज्ञांच्या मेहनतीचा भारतीयाला तितकाच अभिमान आहे. पण यामध्ये महाराष्ट्राच्या लेकीनं देखील मनं जिंकली आहेत.

नांदेडची तनुजा देशपांडे यांचा चांद्रयान मोहिमेमध्ये सहभागी होता. चांद्रयान मोहिम यशस्वी होण्यामध्ये अनेक हात कामाला लागले होते. यामधीलच एक तनुजा होत्या. त्यांच्या या कर्तृत्वासाठी महाराष्ट्राला त्यांचा कायमच अभिमान वाटत राहिल. तनुजा यांनी ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतलं त्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. यु. गवई यांनी तनुजा विषयी 'एबीपी माझा'ला माहिती दिली आहे. 

कोण आहेत तनुजा?

चंद्रयान 3 मोहिमेत सहभागी असलेल्या तनुजा या नांदेडमधील सायन्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कालिदास देशपांडे यांची कन्या आहेत. त्यांचे बालपण नांदेडमधील विद्यानगर येथे गेले आहे. पहिली ते दहावी पर्यंतच शिक्षण पीपल्स हायस्कुल मध्ये झाले. त्यानंतर विज्ञान शाखेची निवड करुन महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला. त्यांचे वडिल कालिदास देशपांडे हे वनस्पतीशास्त्र विषयातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ होते. त्यामुळे तनुजा यांना त्यांच्या घरातूनच शास्रज्ञ होण्याचं बाळकडू मिळालं. तर तनुजा यांच्या आई देखील विज्ञान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होत्या. घरी शैक्षणिक वारसा असल्याने तनुजाच्या हुशारीसाठी पोषक वातावरण तयार झालं. 

तनुजा यांनी  श्री गुरुगोबिंदसिंग जी इंजिनियअरिंग महाविद्यालयामधून  बी टेक आणि एम टेकची पदवी प्राप्त केली. लहानपणापासून तनुजा या अभ्यासामध्ये खूप हुशार होत्या. त्यांच्या पालकांनी देखील हुशार मुलांच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. पंरतु त्यांच्या वडिलांचे 2000 साली निवृत्तीनंतर दोन महिन्यांतच निधन झाले आणि तनुजा या वडिलांच्या मायेला पारख्या झाल्या.  पण तराही त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. अवघ्या दोनच वर्षात म्हणजे 2002 साली त्यांच्या आईचे देखील निधन झाले आणि आईची सावली देखील त्यांच्यापासून दूर गेली. 

आणि स्वप्न सत्यात उतरलं...

शिक्षण पूर्ण झाल्यावर तनुजा यांचा विवाह पुण्यातील  अभिजीत पत्की यांच्याशी झाला. ते सध्या बंगळूरुमधील एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तनुजा यांना शास्त्रज्ञ होण्याची इच्छा लहानपणापासून होती. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम आणि मेहनत घेऊन इस्रोपर्यंतचा टप्पा गाठला. शास्रज्ञ होऊन इस्रोमध्ये काम करण्याची तनुजा यांचं स्वप्न होतं. जे त्यांनी पूर्ण देखील केलं. चांद्रयान मोहिमेमध्ये ज्या अनेक शास्रज्ञांनी काम केलं त्यांच्या यादीमध्ये तनुजा यांचा समावेश आहे. 

चांद्रयान मोहिमेचं नेतृत्व जरी पुरुषांनी केलं असलं तरीही पडद्यामागे अनेक महिला शास्रज्ञांनी देखील हातभार लावला आहे. जवळपास 54 महिलांचा या मोहिमेमध्ये सहभाग होता. त्यांच्या या कार्याला संपूर्ण देशाला कायमच अभिमान वाटत राहिल. 

हेही वाचा : 

Chandrayaan 2 Land : नेतृत्त्व पुरुषांकडे मात्र पडद्यामागे 54 महिला शास्त्रज्ञ, इंजिनिअरची मेहनत; चांद्रयान 3 मोहीम फत्ते!

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget