Jayant Patil Vidhanbhavan : मी शांत नाही, मला पोहोचायला उशीर झाला - जयंत पाटील
Jayant Patil Vidhanbhavan : मी शांत नाही, मला पोहोचायला उशीर झाला - जयंत पाटील
हेही वाचा :
केंद्रीय मंत्री अमित शाह या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदारला धक्का दिला. त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डोक्याला जखम झाली, असा दावा प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. नव्या संसदेच्या मकर द्वाराच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. प्रताप चंद्र सारंगी जखमी झाल्यानंतर भाजपच्या काही खासदारांनी मल्लिकार्जून खरगे आणि प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की केल्याचे समजते.