एक्स्प्लोर

Parliament Winter Session: संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप

pratap sarangi got injured: संसदेच्या मकरद्वारावर झालेल्या धक्काबुक्कीत भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी जखमी झाले आहेत. भाजप खासदारांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप

BJP MP Pratap Chandra Sarangi: केंद्रीय मंत्री अमित शाह या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदारला धक्का दिला. त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डोक्याला जखम झाली, असा दावा प्रताप चंद्र सारंगी यांनी केला.

नव्या संसदेच्या मकर द्वाराच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. प्रताप चंद्र सारंगी जखमी झाल्यानंतर भाजपच्या काही खासदारांनी मल्लिकार्जून खरगे आणि प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की केल्याचे समजते.

 प्रताप चंद्र सारंगी काय म्हणाले?

राहुल गांधींनी एक खासदाराला माझ्या अंगावर ढकलले, त्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो. मी पायऱ्यांवर उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी धक्का दिलेला खासदार माझ्या अंगावर पडला, असा सारंगी यांचा दावा आहे. दरम्यान, प्रताप सारंगी यांना या प्रकारानंतर तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भाजप खासदार मुकेश राजपूत यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीयूष गोयल , धर्मेंद्र प्रधान , शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी इस्पितळात पोहचले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून संसदेत आंदोलन करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. अमित शहा यांनी माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा यासाठी इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु आहे. या घटनेनंतर इंडिया आघाडीचे खासदारही आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाचे खासदार मकरदवाराच्या भिंतीवर चढले. नवीन संसदेच्या परिसरात पहिल्यांदाच भिंतीवर चढून आंदोलन करत आहेत.

राहुल गांधी काय म्हणाले?

या सगळ्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी भाजप खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमकावत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. मला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. भाजप संविधानावर आक्रमण करत आहे, हा मूळ मुद्दा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी या प्रकारानंतर भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, आम्ही याबाबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहोत. तत्पूर्वी संसद परिसरात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या  नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी निषेध मोर्चा काढला. 

राहुल गांधींचा उद्दामपणा, भाजपच्या अजित गोपछडेंची टीका

उद्दामपणा काय असतो ते आम्हाला डोळ्याने पाहायला मिळाला. हिंदुस्थान आमची जहागीर आहे , अशा रीतीने विचार करणारी मानसिकता आहे . केंद्राचा GR फाडणारे हे लोक आहेत. ⁠बाबासाहेबांना दोनदा काँग्रेसने लोकसभेत येऊ दिले नाही. प्रताप सारंगी गरीब आहेत. ⁠ते पडले तर त्यांना बघायला देखील राहुल गांधी थांबले नाहीत. राहुल गांधी लोकांना ढकलून ढकलून पुढे जात होते. जगाचा मालक असल्यासारखे राहुल गांधी पुढे जात होते. ⁠त्या ढकला ढकलीत ते पडले, मी डॉक्टर या नात्याने व्हील चेअर वर बसवलं, असे भाजप खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले.

आणखी वाचा

आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजारही घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, एका डॉलरसाठी किती रुपये लागणार? फेडच्या निर्णयानंतर घसरण
Ram Shinde : राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Nagpur : अमित शाहांनी तातडीने माफी मागावी - आदित्य ठाकरेRam Shinde Vidhan Parishad : राम शिंदेंची विधान परिषद सभापतीपदी एकमताने निवडSanjay Raut Full PC : मालक तुम्ही उद्धव ठाकरे यांना फोन का केला  - संजय राऊतSuresh Dhas BJP : देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडतोय - सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजारही घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, एका डॉलरसाठी किती रुपये लागणार? फेडच्या निर्णयानंतर घसरण
Ram Shinde : राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
Parliament Winter Session: संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले
उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले
Aaditya Thackeray : मंत्र्यांना अजूनही खात्यांचे वाटप झालेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचा हा अपमान; आदित्य ठाकरेंचा इंग्रजीतून टोला
मंत्र्यांना अजूनही खात्यांचे वाटप झालेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचा हा अपमान; आदित्य ठाकरेंचा इंग्रजीतून टोला
Elephanta Boat Accident : दम्याच्या उपचारासाठी नाशिकचं आहेर कुटुंब मुंबईत, समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी नीलकमलमध्ये प्रवास केला अन्...
दम्याच्या उपचारासाठी नाशिकचं आहेर कुटुंब मुंबईत, समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी नीलकमलमध्ये प्रवास केला अन्...
Embed widget