Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Almatti Dam Height : बेळगावमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची 524.26 मीटर पर्यंत वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला आहे.
Almatti Dam Height : कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णय घेतल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा आला आहे. बेळगावमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची 524.26 मीटर पर्यंत वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला आहे. कृष्णाकाठ योजनेतील तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी सव्वा लाख एकर भूसंपादन, पुनर्वसन याला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महापुराच्या गर्तेत सापडलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर दुरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. अलमट्टी धरणाची पाणी पातळी सध्या 519.60 मीटर आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेत उत्तर कर्नाटकावर झालेल्या चर्चेप्रसंगी आमदार बसवराज पाटील-यत्नाळ यांनी अलमट्टी धरणाच्या पाणी सिंचनाचा मुद्दा उपस्थित केला. आपल्या भागात अलमट्टी धरणातून पाणी सिंचन झाले पाहिजे तसे झाले तरच आमचा जगू शेतकरी जगू शकेल,असे नमूद केले.
पश्चिम महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे आता सांगता येणार नाही
दरम्यान, कर्नाटक सरकारच्या निर्णयावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, धरणाची उंची वाढवली वर त्यांचे नियोजन कसे करायचे यांचे नियोजन करण्याची यंत्रणा आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करूनच अलमटी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर परिस्थीत देखील त्यांचा समन्वय असतो. मात्र, आता उंची किती वाढणार व पाणी मागे किती येणार याची मॉडेलिंग तयार करण्याची गरज आहे. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे आता सांगता येणार नाही.
दुसरीकडे अलमट्टी धरणात सांगली, कोल्हापूर महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या मुकुंद घारे समितीने अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा उल्लेख केला आहे. या धरणात ऑगस्टअखेर 519.64 मीटर पाणीपातळी ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेचे उल्लंघन झाल्याने 2005 मध्ये सांगली आणि कोल्हापुरातील महापूर स्थिती भीषण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या