(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Agriculture News : नांदेड कृषी विभागाचा अनागोंदी कारभार समोर, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा, औषधे, बियाणे धुळखात गोदामात पडून
नांदेड कृषी विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा, औषधे, परसबाग साहित्य, भाजीपाला, बियाणं आणि फवारणी किट गोदामातच धूळखात पडल्याचे समोर आलं आहे
Nanded Agriculture Department : नांदेड कृषी विभागाचा (Nanded Agriculture Department) अनागोंदी कारभार समोर आला आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा, औषधे, परसबाग साहित्य, भाजीपाला, बियाणं आणि फवारणी किट गोदामातच धूळखात पडल्याचे समोर आलं आहे. उपलब्ध साहित्य शेतकऱ्यांना वाटप न केल्याप्रकरणी चौकशी करुन दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
तालुका कृषी कार्यालयात मागील काही महिन्यांपासून प्रभारी आहेत. ज्या अधिकाऱ्याकडे प्रभारी कारभार दिला ते कार्यालयात येण्याचे टाळत आहेत. त्यामुळं इतर कर्मचाऱ्यांनी साहित्याचे वाटप न करता, काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ते गोदामातच दडवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे साहित्य शेतकऱ्यांना न देता काळ्या बाजारात विकलं जात असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यानं 14 सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी पंचनामा केला होता. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी भुमरे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा,औषधे, परसबाग साहित्य, भाजीपाला, बियाणं आणि फवारणी किट वाटप केले नसल्याची तक्रार केली होती.
विविध योजनाअंतर्गत कृषी विभागाकडून शेतीच्या निविष्ठा पुरवल्या जातात
विविध योजनेअंतर्गत राज्य सरकारचा कृषी विभाग शेतकऱ्यांना कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे उपलब्ध करुन देते. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवला जातो. महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांची शेतीविषयक कामं अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे, आंतरमशागत यंत्रे, पेरणी आणि लागवड यंत्रे, पीक संरक्षण अवजारे, काढणी आणि मळणी अवजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करुन देणारी यंत्रे वितरीत केली जातात. राज्य सरकारच्या या योजनांमुळं गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होतो. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: