एक्स्प्लोर

Winter Session: 'अधिवेशनाची कामे स्वीकारणार नाही', विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला कंत्राटदारांच्या बहिष्काराचे ग्रहण

हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातली कुठलीही कामे स्वीकारणार नाही, करणार नाही, तसेच वर्क ॲार्डर देखील घेणार नाही अशी कंत्राटदारांची भूमिका आहे.

नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात डिसेंबर महिन्यात होणार आहे. मात्र आता हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला कंत्राटदाराच्या बहिष्काराचे ग्रहण लागले आहे.नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीच्या कामावर बहिष्कार घालणार असल्याचे जाहीर केले आहे.

मागील तीन वर्षांपासून सुमारे 200 कंत्राटदारांचे नागपूर परिसरातील विविध कामांसाठीचे 122 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अडकल्यामुळे नागपूर कॉन्टॅक्टर असोसिएशनने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठीचे काम स्वीकारण्यास नकार दिले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातली कुठलीही कामे स्वीकारणार नाही, करणार नाही, तसेच वर्क ॲार्डर देखील घेणार नाही अशी कंत्राटदारांची भूमिका आहे.

अगोदर आमचं जुनं बिल काढा त्याचे पैसे द्या त्यानंतरच नवीन कामे स्वीकारू अशी भूमिका नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने जाहीर केली आहे. असोसिएशनने त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र देखील  पाठवले आहे.. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात लवकर तोडगा काढला नाही तर नागपूरात विधान भवन, आमदार निवास, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्र्यांचे बंगले असलेले रवी भवन परिसर, तसेच विधान भवनाच्या जवळपासच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम रखडतील आणि प्रशासनासमोर नवा पेच उभा राहिला.

कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही. कोरोनामुळेच सर्वच अधिवेशन मुंबईला (Mumbai) झाली असली तरी त्याचाही कालावधी कमीच होता. यावर्षी कुठलीही अडचण नसल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session Nagpur) नागपुरात होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आढावा घेतला असून या अधिवेशनासाठी 95 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सोमवारपासून तयारीची कामे सुरु होणार असल्याची माहिती आहे.

बांधकाम विभागाकडून (Public Works Department) खर्चाचा आराखडा अंतिम करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. मागील अधिवेशनाच्या तुलनेत 30 कोटींचा जास्त खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नागपुरात (Nagpur) होणारे अधिवेशन सहा आठवड्यांचे घेण्याचा करार आहे. परंतु गेल्या काही दशकाचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंवा तीन आठवड्यांचे होते. यंदाचे अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : मविआच्या जागावाटपाआधीच ठाकरेंचे पत्ते ओपनAaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?Zero Hour : मुख्यमंत्रिपदावर शरद पवारांचं सूचक विधान, पवारांकडून अप्रत्यक्ष घोषणा?Zero Hour Guest Center : मविआचा 260 जागांचा तिढा सुटला, 20 ते 25 जागांचा तिढा कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
Embed widget