एक्स्प्लोर

UPI पेमेंट मोफत सुरु राहणार का? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...

UPI : आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी यूपीआय पेमेंटवर यूजर्सला शुल्क द्यावं लागेल, असं कधीही म्हटलं नसल्याचं सांगितलं आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी आज सकाळी पतधोरण विषयक बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी रेपो रेट कायम ठेवला जाणार असल्याचं जाहीर केलं. सरकारच्या धोरणानुसार यूपीआय पेमेंटसला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं म्हटलं. यूपीआय कायम फ्री राहण्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मी कधीच नाही म्हटलं की यूपीआय कायमस्वरुपी फ्री राहील. आता देखील ते पूर्णपणे फ्री नाही, कोणीतरी त्याचा खर्च उचलत आहे, असं संजय म्हलोत्रा म्हणाले. 

संजय म्हलोत्रा यापुढं म्हणाले की कुठे ना कुठे याचा खर्च दिला जात आहे. मात्र, खरा प्रश्न हा आहे की हा खर्च कोण उचलत आहे. ते म्हणाले कोण पेमेंट करतंय हे महत्त्वाचं आहे मात्र जास्त गरजेचं हे आहे कोणीतरी याचा खर्च उचलत आहे. टिकावू व्यवस्था निर्माण करण्यासाठी ती सामूहिक असो किंवा वैयक्तिक रुपात असो कोणाला ना कोणाला तरी खर्च करावा लागत असतो. सरकार यासाठी सब्सिडी देत आहे. 

संजय म्हलोत्रा यांनी हे देखील स्पष्ट केलं की यूपीआय पेमेंटसाठी लागणारं शुल्क यूजर्सकडून घेतलं जावं याची आवश्यकता नाही. मी कधीच म्हटलं नाही की याचा खर्च यूजर्सकडून घेतला जाईल, असंही ते म्हणाले. 

आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी सरकारच्या धोरणांनी ग्राहकांमध्ये यूपीआयच्या वापराला प्रोत्साहन देम्यात महत्त्वाची भूमिका बजावली आङे. गेल्या काही महिन्यात यूपीआयचे व्यवहार सातत्यानं वाढत आहेत, असं म्हटलं. 

नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये यूपीआय व्यवहार 19.47 अब्ज झाले आहेत. किमतीच्या नुसार विचार केला हा तर याचं मूल्य 25.08 लाख कोटी रुपये होतं. तर, मे महिन्यात 25.14 लाख कोटींचे व्यवहार झाले होते.

दरम्यान, आरबीआयनं ऑगस्टचं पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 5.5 टक्के कायम ठेवला आहे. आरबीआयनं गेल्या तीन पतधोरण बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये कपात केली होती. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Highest Dividend : कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Embed widget