Winter Assembly session : नागपूर मनपात नगरविकासचे सचिवालय; प्रधान सचिवांसह इतर अधिकाऱ्यांची व्यवस्था
NMC: प्रशासकीय इमारतीत नगरविकास विभागाचे दोन सचिव बसणार आहेत. याशिवाय, 7 अधिकाऱ्यांचे कक्षही मनपात असेल. त्यामुळे महापौर, उपमहापौरांचे कक्ष वगळता इतर पदाधिकाऱ्यांचे कक्ष देण्यात येणार आहे.
Nagpur News : हिवाळी अधिवेशनासाठी सरकार मायबाप नागपुरात येत आहेत. विधीमंडळाचे सचिवालय सुरू झाले आहे. तसेच, विविध विभागांचे कार्यालयही सुरू होईल. सिव्हील लाईन्स येथील हैद्राबाद हाऊस येथे विविध विभागांचे कार्यालय थाटले जात असतानाच मनपाच्या मुख्यालयात नगरविकास विभागाचे कार्यालय असेल. या कार्यालयात विभागाचे प्रधान सचिवांसह इतरही अधिकारी असतील. तुर्तास, मुख्यालयात दोन सचिव व कक्ष अधिकाऱ्यांसाठी कक्ष तयार केला जातो आहे.
प्रशासनात नगरविकास विभाग अत्यंत महत्वाचा
महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) हे नगरविकास विभागाच्या अंतर्गत येत असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मनपात नगरविकास विभागाचे कार्यालय सुरू करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने हा विभाग मनपात सज्ज असतो. प्रशासनात नगरविकास विभाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. तसेच या विभागाचा कर्मचारीवर्गही जास्त आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक ती सुविधा असलेली इमारत मनपाची आहे. यापूर्वी मनिषा पाटणकर -म्हैसकर या विभागाच्या प्रधान सचिव असताना मनपातच त्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले होते.
पहिल्या माळ्यावर सचिव कक्ष
मनपाच्या प्रशासकीय इमारतीतीतल पहिल्या माळ्यावर नगरविकास विभागाचे दोन सचिव बसणार आहेत. याशिवाय, जवळपास 7 अधिकाऱ्यांचा कक्षही मनपात असेल. त्यामुळे महापौर, उपमहापौरांचे कक्ष वगळता इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे कक्ष अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
मनपा पुन्हा गजबजणार
महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांचा कार्यकाळ 4 मार्च रोजी संपला. 5 मार्चपासून मनपात प्रशासक राज सुरू झाले. तेव्हापासून मनपातील महापौर, उपमहापौर, सत्तापक्षनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे सभापती, गटनेत्यांची कार्यालये कुलूपबंद होती. या कक्षाच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. या कक्षातील धूळ स्वच्छ करून ते चकाचक युद्ध पातळीवर सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने का होईना पुन्हा मनपा गजबजणार असल्याचे चित्र आहे.
ही बातमी देखील वाचा