एक्स्प्लोर
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नागपुरात 22 हजार हेक्टर शेतीचे नुकसान : जिल्हाधिकारी
विदर्भात आजही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी ठरणार आहेत.
![अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नागपुरात 22 हजार हेक्टर शेतीचे नुकसान : जिल्हाधिकारी Unseasonal rains and hailstorm damage crops on 22 thousand hectares in Nagpur अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नागपुरात 22 हजार हेक्टर शेतीचे नुकसान : जिल्हाधिकारी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/03124603/Nagpur-Crop-Loss-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूर जिल्ह्यात काल झालेल्या गारपिटीमुळे तब्बल 22 हजार हेक्टर क्षेत्रात शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वच 13 तालुक्यांमध्ये काल (2 जानेवारी) अवकाळी पाऊस झाला असून 116 गावांमध्ये गारपीट झाल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे. या गावांमधील शेती अक्षरश: भुईसपाट झाली आहे.
सर्वाधिक नुकसान कापसाच्या शेतकऱ्यांचे झाले असून तब्बल 13 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक गारपिटीमुळे वाया गेले आहे. तर 4 हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा आणि मोसंबी या फळ पिकांचे आणि 3 हजार हेक्टरवरील तूर पिकांचे नुकसान झाले आहे.
विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात काल गारपीट झाली. अवकाळी पाऊस तसंच गारपीटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आजही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी ठरणार आहेत.
विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत; रब्बी पिकं धोक्यात
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, नागपूर आणि अमरावतीत गारपीट
दरम्यान गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना भेटून सर्वेक्षणाला उशीर न करता लगेच सर्वेक्षण सुरु करण्याची, तसंच हे सर्वेक्षण ग्रामसभेला आणि स्थानिक लोकांना कळवून करण्याची मागणी केली आहे. तसंच, किमान 50 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मराठवाड्यातही पावसाची हजेरी
सलग तीन दिवसापासून परभणी शहरासह जिल्हाभरात पाऊस सुरु आहे. आज पहाटेपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु आहे, पावसाळ्या प्रमाणे हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. हरभरा, ज्वारी, तूर या पिकांवर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव झाला असून मागच्या आठवडाभरापासून सूर्यदर्शन नसल्यामुळे या पिकांची अवस्था बिकट होत चालली आहे. सकाळी पाऊस, दुपारी गर्मी आणि सांयकाळी थंडी अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव सध्या परभणीकरांना येत आहे.
Uncertain Rain and Hailstorm | विदर्भात गारपीट, शेतीचंं मोठं नुकसान | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)