एक्स्प्लोर

विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत; रब्बी पिकं धोक्यात

मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यातून सावरत असतानाच नववर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू झालाय. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत.

नागपूर : विदर्भात असलेले ढगाळ वातावरण आणि नागपुरात कालपासून गारपीट आणि मुसळधार पाऊस बरसल्यानंतर याचा परिणाम आता विदर्भाच्या अन्य भागात जाणवू लागला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात वाशिम, नांदेड, यवतमाळ, हिंगोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली आहे. चंद्रपूर शहर-जिल्ह्यात काल (गुरुवार)पूर्ण दिवसभर ढगाळलेले -कुंद वातावरण होते. उशिरा रात्री पावसाच्या सरींना प्रारंभ झाला. पहाटे काही कालावधीसाठी पावसाचा जोर वाढला होता. सकाळी थोड्या-थोड्या कालावधीने पाऊस बरसत असून सध्या शहर जिल्ह्यातील वातावरणात हलके धुके पसरले आहे. या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे शेत शिवारात असलेली गहू-हरभरा या पिकांना नुकसान पोचण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पूर्ण दिवस पाऊस असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढचे काही दिवस शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी ठरणार आहेत. मराठवाड्यातही पावसाची हजेरी - सलग तीन दिवसापासून परभणी शहरासह जिल्हाभरात पाऊस सुरू आहे. आज पहाटेपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे, पावसाळ्या प्रमाणे हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. हरभरा, ज्वारी, तूर या पिकांवर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव झाला असून मागच्या आठवडाभरापासून सूर्यदर्शन नसल्यामुळे या पिकांची अवस्था बिकट होत चालली आहे. सकाळी पाऊस, दुपारी गर्मी आणि सांयकाळी थंडी अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव सध्या परभणीकरांना येतोय. नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा फटका - अमरावती जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील तूर, कपाशी आणि रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकांचे नुकसान झाले आहे. तर, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचा हंगाम धोक्यात आला असून गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर कालपासून झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि तूर हे पिक धोक्यात आलं आहे. हिंगोली शहरात काल सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. तर जिल्ह्यातील इतरही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. नववर्षातील पहिल्याच अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या तूर पिकाचे आणि शेतातील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. हेही वाचा - राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, नागपूर आणि अमरावतीत गारपीट Uncertain Rain and Hailstorm | विदर्भात गारपीट, शेतीचंं मोठं नुकसान | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : मोदी सरकार घाबरलंय, म्हणून दबावतंत्र अन् हिटलरशाहीचा वापर; हे सरकार इंग्रजापेक्षाही अधिक क्रूर; दिल्लीतील आंदोलनावरून नाना पटोलेंचा घणाघात
मोदी सरकार घाबरलंय, म्हणून दबावतंत्र अन् हिटलरशाहीचा वापर; हे सरकार इंग्रजापेक्षाही अधिक क्रूर; दिल्लीतील आंदोलनावरून नाना पटोलेंचा घणाघात
Sudhakar Kohale: गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, निराश झाल्यावर त्यातून बाहेर काढणारे ज्येष्ठ नेते; पण...; नागपूर भाजपातील बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले
नागपुरातील भाजपच्या बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले, म्हणाले, गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, पण....
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget